Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला पोहोचले आहे. आता युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सज्ज झाले आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आज AI1944 या विमानानं भारतात येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. युक्रेनवरून येणाऱ्या प्रवासी हे स्पेशल कॉरिडॉरमधून बाहेर जातील.  सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळावरील विमानतळ आरोग्य संघटना (APHO) टीम ही सर्व प्रवाशांचे तापमान तपासणार आहे.  


प्रवाशांनी विमानतळावर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. जर कोणता प्रवासी यापैकी कोणतेही कागदपत्र दाखवू शकला नाही तर त्यांना विमानतळावर आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. या टेस्टचा खर्च विमानतळाद्वारे केला जाणार आहे. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हे प्रवासी विमानतळावरून बाहेर पडू शकतील. जर कोणत्या प्रवाशाच्या टेस्टचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला तर त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे.





प्रवाशांना या सुविधा दिल्या जाणार
युक्रेनवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी फ्री वाय फाय, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पाणी आणि अन्न पदार्थ इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.  


युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे निर्वासन विमान दुपारी 4 वाजता मुंबईत दाखल होत आहेत. आज केंद्रीय मंत्री पियूष गोयल, महापौर किशोरी किशोर पेडणेकर हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरितांचे स्वागत करतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha