Beed Crime news: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasale) याला हलवण्यात आले आहे. त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेला बीड कारागृहातून (Beed Crime news) हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Continues below advertisement


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह (Walmik Karad) सुदर्शन घुले आणि इतर आरोपी बीड कारागृहात आहेत. अशातच रणजीत कासलेने वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते. ॲट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजीत कासले न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. कासले विरोधात बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि परळी पोलीस ठाण्यात कसले विरोधात गुन्हे दाखल आहेत. 


साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणातील साक्षीदाराला आरोपीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या 


बीड मधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात आरोपी अभिषेक कदमच्या नातेवाईकांकडून साक्षीदाराला धमकावल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान यासंबंधीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. बीडमधील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळेने, छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून धाराशिव येथे आत्महत्या केली होती. या प्रकरणात अभिषेक कदम या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या अभिषेक जामिनावर बाहेर आहे. मात्र, अभिषेकच्या नातेवाईकाने यातील साक्षीदार अभिषेक बहिरवाळ याला धमकावल्याचे समोर आले आहे. 


'तू साक्षी कांबळे या प्रकरणामध्ये साक्ष देऊ नकोस. जर साक्ष दिली.. तर तुला गावात राहू देणार नाही.. माझ्या भावाचा मुलगा अभिषेक कदम याला शिक्षा झाली तर तुला तिथे गावात येऊन हाणमार करू.. तसेच साक्षीच्या आईला केस मिटवण्यासाठी सांग..' असे धमकावल्याची तक्रार साक्षीदाराने पोलीस ठाण्यात दिली आहे. 


बीड जिल्ह्यात अडव्हांटा सीड्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक ?


माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील शेतकरी, सतीश गंगाधरराव बुरंगे यांनी अडीच एकर उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून ऍडव्हान्टा सीड्स कंपनीच्या GS-85 वाणाच्या फुल गोबीची लागवड 95 दिवसांपूर्वी केली होती. तब्बल अडीच एकर क्षेत्रावरील कोबीची केलेली लागवड गेली वाया. कंपनीच्या शिफारशी प्रमाणे खते ,फवारण्या, इतर मशागत करूनही कोबीच्या झाडाला कोणतेही फुल अथवा गड्डा आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले असून न फळणारे वाण देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ॲडव्हान्टा सीड्स कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नारायण गोले पाटील आणि शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 



आणखी वाचा


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरशिवाय केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या राज्यात शिरला, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कोण आहे रणजीत कासले?