Ranjit Kasle On Walmik Karad: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed News) जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असंही रणजीत कासले म्हणाले. आता वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
कोण आहेत रणजीत कासले? (Who is Ranjit Kasle?)
- रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. - सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते. - मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता - परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली असा आरोप त्यांच्यावर होता. - विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रंजीत कासले यांनी केला होता.- तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते. - आता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यांनी केला आहे.