Thudarum Box Office Collection Day 3: 2025 ची सुरुवात बॉलिवूडसाठी (Bollywood) तशी समाधानकारक ठरली. बॉक्स ऑफिसवर (Box Office) रिलीज झालेल्या विक्की कौशलच्या 'छावा'नं (Chhaava) धुवांधार कमाई करुन बॉलिवूडची लाज राखली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यापूर्वी आणि त्यानंतर आलेले बॉलिवूडपट तशी फारशी कमाई करू शकले नाही. 'सिकंदर' (Sikandar), 'जाट' (Jaat), 'केसरी 2' (Kesari 2) यांसारख्या चित्रपटांचा बोलबाला दिसला खरा, पण बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करू शकलेले नाहीत. पण, या बॉलिवूडपटांच्या वादळात काही साऊथ सिनेमे (South Movie) आले आणि धुवांधार कमाई करून बॉक्स ऑफिस गाजवून गेले. सध्या असाच एक साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. या चित्रपटानं नाव आहे, 'थुडारम' (South Movie Thudarum). ज्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल धम्माल करत आहे.
'थुडारम' हा एक मल्याळम चित्रपट आहे, जो 25 एप्रिल रोजी इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. मल्याळम व्यतिरिक्त, हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे.
'थुडाराम'ची तीनच दिवसांत धुवांधार कमाई
सॅकॅनिल्कच्या वृत्तानुसार, 'थुडारम'नं पहिल्या दिवशी 5.25 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपले खाते उघडले. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला आणि चित्रपटाने 8.6 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह, हा 2025 मधील सहावा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट बनला. आता तिसऱ्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, त्यानुसार 'थुडारम'ने रविवारपर्यंत (रात्री 10 वाजेपर्यंत) 10.25 कोटी रुपये कमावले आहेत.
| दिवस | इंडिया नेट कलेक्शन |
|---|---|
| दिवस 1 | 5.25 कोटी |
| दिवस 2 | 8.6 कोटी |
| दिवस 3 | 10.25 कोटी |
| एकूण | 24.10 कोटी |
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मोहनलालच्या चित्रपटाचा एकूण तीन दिवसांचा कलेक्शन आता 24.10 कोटी रुपये झाला आहे.
'थुडाराम'नं 'केसरी 2', 'ग्राउंड झिरो' आणि 'जाट'लाही टाकलं मागे
'थुडारम'च्या जबरदस्त कलेक्शननं पडद्यावर सर्व बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं आहे. 'थुडाराम' सोबत प्रदर्शित झालेल्या 'ग्राउंड झिरो'नं तीन दिवसांत फक्त 4.92 कोटी रुपये कमावले आहेत. रविवारच्या कलेक्शनमध्ये, अक्षय कुमारचा 'केसरी 2' 8.15 कोटी कमाई करून 'थुडारम' नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 'जाट' आतापर्यंत फक्त 1.79 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, रेजापुत्रा व्हिज्युअल मीडियाच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या मोहनलाल यांच्या 'थुडाराम'चं दिग्दर्शन थरुन मूर्ती यांनी केलं आहे. मोहनलाल यांच्याशिवाय शोभना, मनियांपिल्ला राजू, बिनू पप्पू आणि इर्शाद अली चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :