Beed Crime News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण बीड जिल्हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला आहे. दरम्यान, बीडची गुन्हेगारी (Beed Crime) रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बीडच्या केज (Kaij) तालुक्यातील वरपगाव (Varapgaon) येथून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'तुमची मुलगी मला द्या..' असे म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अद्याप या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
बंदुकीच्या धाकावर मारहाण, नंतर गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला असल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय. केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर दिवसाढवळ्या हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे गावगुंड इथवरच थांबले नाहीत, तर यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केलंय. बाजीराव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप कुणावरही पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्याचे नाव आणि इथली गुन्हेगारी नव्याने चर्चेत आली आहे.
पोलीस अधीक्षकांची भेट घेणार, न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार
दरम्यान, या मारहाण प्रकरणी शिक्षकाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. तर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा ही या कुटुंबाने दिलं आहे. कुऱ्हाडीने मारहाण करत मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईक महादेव घुमरे यांनी केलाय. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आणि हा अपघात दर्शविण्यात आला, असेही ते म्हणाले. बाजीराव डोईफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या