Beed Crime news: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) हा तुरुंगात असला तरी त्याचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यात दहशत कायम राखून आहेत, असा दावा बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी केला. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली होती. एसआयटी आणि सीआयडीने संयुक्तपणे या हत्याप्रकरणाता तपास केला होता. त्यावेळी सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी  विश्वांभर गोल्डे यांचा जबाब नोंदवून घेतला होता. 23 फेब्रुवारी 2025 रोजी हा जबाब नोंदवण्यात आला होता. या जबाबाचा तपशील आता समोर आला असून त्यामध्ये विश्वांभर गोल्डे यांनी अनेक खळबळजनक दावे केले होते.

आवादा एनर्जी कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला सीआयडीने 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात ताब्यात घेतले होते. त्यानंतर सहा जानेवारी रोजी कराड समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला. त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर केले. यावेळी काही लोकांनी हातात दगड घेत गोंधळ घातला होता. परंतु आपण परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा गोल्डे यांनी केला आहे. 

वाल्मिक कराड हा सराईत गुंड असल्याचे माहिती असूनही बीड पोलिसांकडून (Beed Police) त्याला संरक्षण देण्यात आले होते. त्याच्या बंदोबस्तासाठी 18 अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते. 22 जानेवारीला वाल्मिक कराड याला न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष व सहा महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. वाल्मिक कराड याने 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हा वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु, वाल्मिक कराड याला पहिल्यांदा अटक झाल्यानंतर त्याच्यावर संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा दावाही विश्वांभर गोल्डे यांनी केला. मात्र, वाल्मिक कराड बीडच्या मध्यवर्ती कारागृहात असूनही जिल्ह्यात त्याच्या कार्यकर्त्यांकडून दहशत कायम ठेवली जात असल्याच्या गोल्डे यांच्या दाव्याने बीड पोलीस दल नव्या वादात सापडले आहे.

Santosh Deshmukh Case: अचानक संतोष देशमुखांच्या घरी धडकली, त्या महिलेमुळे गूढ वाढले

बीड पोलिसांकडून संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. या महिलेनं कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला. या महिलेने एक रात्र संतोष देशमुखांच्या घराबाहेर बांधण्यात आलेल्या मंडपात मुक्काम केला. त्यानंतर या महिलेने देशमुख कुटुंबीयांच्या घरातील बाथरुममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे देशमुख कुटुंबीय चक्रावले होते. ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे, एवढीच माहिती समोर आली आहे. या महिलेचा नाव आणि इतर तपशील अद्याप समजू शकलेला नाही. बीड पोलिसांकडून सध्या या महिलेची माहिती गोळा केली जात आहे. 

आणखी वाचा

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजीत कासलेवर तिसरा गुन्हा दाखल, व्यापाऱ्याकडून सहा लाख घेतल्याचा आरोप