Beed Crime News : पैशाच्या आर्थिक व्यवहारातून एका साखर कारखान्यावरील मजूर पुरवठादार अधिकार्याचं अपहरण झाल्याची घटना बीडच्या केजमध्ये घडली आहे. या मजूर पुरवठा अधिकाऱ्याला कर्नाटक राज्यातील शंकेश्वर साखर कारखान्यावर डांबून ठेवल्या प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील लव्हुरी येथील चाळक यांचे वडवणी येथील एका हॉटेलमधून अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या मुलांना त्यांची सुटका करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अपहरण कर्त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जर पैसे आणून दिले नाहीत. तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे.
केज तालुक्यातील लव्हुरी ये सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखाना येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी वडवणी येथून काही अज्ञात लोकांनी अपहरण केलं. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
27 रोजी त्यांचा भाऊ आणि मुलं यांना चाळक यांच्या फोनवरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर उर्फ सुदाम चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकरडींगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत आहे. तरी देखील ते अमानुष आणि बेदम मारहाण करीत असल्याचा आहेत.
अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत आहेत. तर शिवीगाळ करत आहेत. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करीत आहेत. जर पैसे आणून दिले नाहीत तर जीवे मारू अशी धमकी फोनवरून दिली आहेत. अक्षय चाळक यानं त्याचे वडील सुधाकर चाळक यांचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करू मारहाण करून पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशाच्या देवाण घेवाणीतून अपहरण?
सुधाकर चाळक यांचे कुटुंबीय हे जरी त्यांच्याकडे कुणाचे पैसे नव्हते असे सांगत असले तरी मात्र अपहरणकर्ते आणि त्यांच्या मुलातील संवादावरून हे अपहरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे जाणवते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chandrapur: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांसह 15 जणांना अटक
- सुनेला सासरी न पाठवल्याचा राग! सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा, अकोल्यातील घटना
- Nagpur: 'मी काहीही चोरलेले नाही..., मात्र, तुम्ही भिकारी'; घरी काही मुद्देमाल न मिळाल्याने चोरांचा चिठ्ठीतून संताप व्यक्त
- Beed News Update : महिलेच्या खुनाने परळी पुन्हा हादरली, तीन दिवसांत तीन हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha