Chandrapur: मालमत्तेचं जास्त मूल्यांकन करून कर्ज वाटप केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राजीव कक्कड यांनी दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांच्याकडं तक्रार केली होती.
अटक झालेल्यांमध्ये शाखा व्यवस्थापक देविदास कुळकर्णी, लोन प्रोसेसिंग अधिकारी विनोद लाटेलवार आणि पंकजसिंह सोलंकी यांचा समावेश आहे. या सोबतच गणेश नैताम या एजंट सह 11 मालमत्ता धारकांना देखील अटक कऱण्यात आली आहे. बैंकेच्या या फसवणूक प्रकरणात आरोपींनी बनावट आयकर रिटर्न तयार करून आणि मालमत्तांचे जास्त मूल्यांकन दाखवून 44 प्रकारणांमध्ये 14 कोटी 26 लाखांचे कर्जवाटप केले होते. मात्र, हे सर्व कर्ज एनपीए झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष राजीव कक्कड यांनी 2 वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे याबाबत तक्रार केली होती.
त्याच आधारावर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मुख्य म्हणजे ज्या लोकांना हे कर्ज देण्यात आले ते कर्जदार अतिशय गरीब आणि सर्वसामान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या लोकांचे खोटे आयकर रिटर्न तयार करून त्यांच्या नावे काही मोठ्या प्रॉपर्टी डीलर्स नी कर्जाची ही रक्कम हडप केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात बैंकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर्स यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- सुनेला सासरी न पाठवल्याचा राग! सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा, अकोल्यातील घटना
- Nagpur: 'मी काहीही चोरलेले नाही..., मात्र, तुम्ही भिकारी'; घरी काही मुद्देमाल न मिळाल्याने चोरांचा चिठ्ठीतून संताप व्यक्त
- Beed News Update : महिलेच्या खुनाने परळी पुन्हा हादरली, तीन दिवसांत तीन हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha