एक्स्प्लोर

Beed Crime: बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली

अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Beed: बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. नुकत्याच पंधरा लाखांच्या दरोड्याच्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच, आता बीडजवळील पाली गावातील कॅनरा बँकेवर दरोडा( Robbery News) पडला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील भिंतीला छेद करून आत प्रवेश केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Beed Crime)

गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडली

चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडली आणि त्यातील लाखो रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केली. प्राथमिक अंदाजानुसार, चोरी गेलेल्या रकमेत मोठी रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र नेमकी आकडेवारी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बँकेत आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. बँकेच्या आत पसारा आणि तिजोरी फोडलेली पाहून त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना कळवले. या दरोड्यानंतर स्थानिकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण आहे. 

दरम्यान, पाली गावातील या बँक दरोड्यामुळे बीड पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच बीड शहरात पंधरा लाखांच्या दरोड्याची घटना घडली होती, आणि आता पुन्हा अशाच प्रकारचा बँक दरोडा घडल्याने जिल्हा पोलिसांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली आणि संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे. 

ग्रामीण पोलिसांसह फॉरेनसिक टीमकडून तपासाला सुरुवात 

बीड तालुक्यातील पाली गावात कॅनरा बँकेची शाखा आहे. मध्यरात्रीच्या सुमारास याच बँकेवर दरोडेखोरांनी सशस्त्र धाडसी दरोडा टाकला अगदी सिनेमाला शोभेल असा.. दरोडा टाकून दरोडेखोरांनी जवळपास 18 लाखांची रोकड लंपास केली असं प्रथम दर्शनी दिसून आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांसह फॉरेनसिक टीम सर्व घटनेचा तपास करत आहे. 

दरोडेखोरांनी आधी रेकी करून बँकेवर दरोडा टाकला. मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकला गेला. बँकेच्या पाठीमागील असलेल्या भिंतीला गॅस कटरच्या सहाय्याने 16 इंच ड्रिल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रित होऊ नये याची संपूर्ण खबरदारी दरोडेखोरांनी घेतली. त्यामुळे चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. 

पाली गावात असलेल्या या बँकेची सुरक्षा केवळ सात सीसीटीव्ही कॅमेराच्या भरोशावर होती. कोणताही सुरक्षा गार्ड या ठिकाणी तैनात नाही. त्यामुळे अगदी वेळ घेऊन दरोडेखोरांनी बँकेवर हात साफ केला. यापूर्वी दोन वेळा या बँकेवर चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान आता दरोडेखोर नेमके किती होते? दरोड्याची आणखी रक्कम किती? असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान बीड पोलिसांसमोर आहे.

Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार

 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget