एक्स्प्लोर

सुनेला मुलगा होत नसल्याने भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार

मुलगा होत नाही म्हणून सासूने आपल्या तीन मुलांसाठी सहा सुना घरी आणल्या. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बीड : मुलगा होत नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून सुनेवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. मात्र, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये वंशाच्या दिव्यासाठी आईने तीन मुलांसाठी चक्क सहा सुना करून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सुनेला मुलगा होत नाही म्हणून आपल्या भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यामध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणात आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे. आपल्या तिन्ही मुलांना मुलगा होत नसल्याने चक्क मुलाच्या आईनेच तीनही मुलांसाठी सहा सुना घरी आणल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर समोर आला आहे.

आष्टी तालुक्यातला जळगाव येथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबात आई वडील आणि तीन मुलं आहेत. तीनही मुलं विवाहित असून यापैकी कोणालाच मुलगा होत नसल्याने सासूने चक्क तिघांसाठीही सहा सुना आणल्या होत्या. एका मुलाच्या पहिल्या पत्नीला मुलगा न झाल्याने तिच्यासोबत काडीमोड घेतला आणि त्या मुलाच दुसरं लग्न लावून दिलं. दुसऱ्याही पत्नीला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मुलगीच झाली. त्यामुळे हट्टाला पेटलेल्या सासूने आपल्या 29 वर्षीय सुनेला स्वतःच्या 23 वर्षीय अविवाहित भाच्यासोबत बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

सुनेने विरोध केल्यानंतरही तिला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिला हा घाणेरडा प्रकार करण्यास सासरच्या मंडळींनी दबाव टाकला. हे सर्व अत्याचार सहन न झाल्याने दोन ऑगस्ट रोजी पीडित सुनेने थेट आष्टी पोलीस ठाणे गाठलं आणि झालेल्या अत्याचाराची माहिती देऊन सासू-सासरा आणि पती व अत्याचार करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसात तक्रार दिली.

या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी पीडितेचा पती व सासर्‍याला अटक केली होती. मात्र, त्यांना आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. तर या प्रकरणात पीडितेवर अत्याचार करणारा तरुण आणि पीडितेची सासू सध्या फरार आहेत. या आरोपींना तात्काळ अटक आणि शिक्षा न झाल्यास उद्या 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पीडितेने पोलिसांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget