एक्स्प्लोर

Badlapur Case : बदलापुरात शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनासह शाळांकडून हलगर्जीपणा 

Badlapur School Girl Sexual Assault : बदलापूर प्रकरणातील आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ठाणे : चार वर्षाच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅन चालकाने व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केल्याने (Badlapur Sexual Assault) बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे, या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. असं असलं तरी बदलापुरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे लहान मुलांच्या, विशेषकरून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीला सध्या 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चार वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेतून परत येत असताना व्हॅन चालकानेच अतिप्रसंग केला. ही घटना समोर येताच बदलापूर पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत व्हॅन चालकाला अटक करण्यात आली.

Badlapur School Girl Sexual Assault  : व्हॅन चालकाला अटक

ज्या व्हॅनमधून ही चिमुकली रोज शाळेत ये जा करायची त्याच व्हॅनच्या चालकाने चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरी येताच तिने घरच्यांना घडलेल्या प्रकार सांगितला. ही हकीकत ऐकताच त्यांना देखील धक्काच बसला. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट बदलापूर पोलीस ठाणं गाठलं. 

ऑगस्ट 2024 मध्ये दोन शाळकरी मुलींवर शाळेतीलच अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन बदलापूर पेटून उठल होतं. माणुसकीला काळिमा फसणाऱ्या या घटनेनंतर अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये पोलिसांनी मारलं खरं, पण या संपूर्ण घटनेची आठवण आजही बदलापूरवासियांमध्ये ताजी आहे. त्यातच आता पुन्हा एकदा 4 वर्षाच्या चिमुकलीवर व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. 

Badlapur Rape Case : बदलापूरवासियांमध्ये संताप

ही घटना समोर येताच बदलापूरवासियांनी संताप व्यक्त करत ज्या व्हॅनमध्ये हे कृत्य घडलं तिची तोडफोड केली. व्हॅन चालकाकडे कोणताही परवाना नसल्याने आरटीओ कडून कारवाई देखील करण्यात आली आहे. स्थानिक राजकारण्यांनी महिला आयोग तसेच शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी देखील केली. 

शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या या घटनेमुळे बदलापुरात शाळकरी मुलींना नेमक का लक्ष केल जातंय? प्रशासनासह शाळांकडून कुठे हलगर्जीपणा तर होत नाही ना? या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे.

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Embed widget