Badlapur Crime News : धुलिवंदनाच्या दिवशी बदलापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सणाच्या दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीने मुलीला घरी न आणल्याने आणि व्हिडीओ कॉल वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नैराश्येच्या भरात हे पाऊल उचलल्याने अख्खं कुटुंब उध्वस्त झालं आहे. बदलापूरच्या वडवली परिसरात शंकर जाधव, वडील ,आई, पत्नी, आणि 2 महिन्याच्या लहान मुलीसह राहत होता. मात्र पतीने आई वडिलांसोबत न राहता वेगळे राहावे अशी शंकरच्या पत्नीचे म्हणणे होते. त्यावरून त्याच्यात वारंवार वाद होत होते. असे मयत शंकरच्या नातेवाईकांनी सांगितले. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी यावरूनच वाद झाले आणि शंकरची पत्नी 2 महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. आज सणानिमित्त पत्नी मुलीला घेऊन घरी येईल असे शंकरला वाटले होते, मात्र पत्नी आली नाही. तसेच तिने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवायला नकार दिला.


शंकरने पत्नीला फोन करून मुलीला घरी घेऊन ये असे सांगितले, मात्र पत्नीने तुम्ही घ्यायला या म्हणत स्वतः यायला नकार दिला. यानंतर शंकरने पत्नीला आत्महत्या करत असल्याचा फोन करत रागाच्या भरात शंकरने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 


ऐन धुलिवंदनाच्या दिवशी बदलापुरात हा प्रकार घडल्याने वडवली भागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 




मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live





 





 




महत्त्वाच्या इतर बातम्या :