एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर घरात घुसून हल्ला; हल्लेखोर निलंबित प्राध्यापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

माजी कुलगुरु डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी  शैक्षणिक संस्थेतील या हल्लेखोर प्राध्यापकांचे गैरवर्तन आणि  कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते.याच वादातून या कुलगुरुंना मारहाण झाली.

मुंबई :  मुंबई विद्यापिठाचे (Mumbai University)  माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर काहींनी घरात घुसून हल्ला केलाय. हे हल्लेखोर निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात डॉ. प्रधान हे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी  शैक्षणिक संस्थेतील या हल्लेखोर प्राध्यापकांचे गैरवर्तन आणि  कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. याच वादातून या कुलगुरुंना मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील कुलगुरुंच्या  ही घटना  घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात  हल्लेखोरांविरोधात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. डॉ. अशोक प्रधान असे हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी माजी कुलगुरूंचे नाव आहे. तर निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय 50), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय 32), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपीला चार वर्षापूर्वी केले होते निलंबीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अशोक प्रधान हे मुंबई विद्यापीठातून निवृत्तीनंतर तो गेल्या काही वर्षांपासून समिती सदस्य म्हणून दुसऱ्या शिक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी त्या शैक्षणिक संस्थेतील हल्लेखोर प्राध्यापकाचे गैरवर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. त्यामुळे प्राध्यापकाचे वेतन घेणाऱ्या आरोपीचे वेतन बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता.

नोकरीवर परत रूजू घेण्यास नकार दिल्याने केला हल्ला

याच वादातून रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुख्य आरोपी इतर चार जणांसह प्रधान यांच्या बंगल्यात गेले होते. त्यावेळी बंगल्यात आरोपी प्राध्यापकाने मला नोकरीची खरोखरच गरज आहे. म्हणून मला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्या. असा तगादा डॉ. प्रधानकडे लावला होता. त्यावेळी प्रधान आणि त्यांची पत्नी घरात होत्या. मात्र डॉ. प्रधान यांनी नोकरी घेण्यास नकार दिल्याने वाद होऊन काही क्षणातच आरोपी जाधव यांनी डॉ. प्रधानांवर हल्ला केला.

दरम्यान, डॉ. प्रधान यांच्या पत्नीने ताबडतोब पोलिसांना बोलावले. त्यानंतर महात्मा फुले पोलिस स्टेशनचे एक पथक प्रधान यांच्या बंगल्यावर पोहोचले, त्यांना रुग्णालयात नेले जेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 452, 341, 504, 34 अन्वये सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget