एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: 'तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही'; माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Ashok Kharat Nashik Crime News: “तू खूप सुंदर आहेस”, “तुझा पती तुला समजून घेत नाही”, “तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही” अशा बोलांनी अशोक खरात महिलांना प्रभावित करत असल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, विशेषतः महिलांना लक्ष्य करून त्याने रचलेल्या मानसशास्त्रीय सापळ्याचा तपासात उलगडा होत आहे. पोलिसांच्या (Police) चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, खरात महिलांशी गोड बोलून, त्यांची स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. “तू खूप सुंदर आहेस”, “तुझा पती तुला समजून घेत नाही”, “तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही” अशा बोलांनी तो महिलांना प्रभावित करत असल्याचे समोर आले आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खरात स्वतःला ‘माइंड रीडिंग’मध्ये पटाईत असल्याचे भासवत असे. प्रत्यक्षात मात्र तो समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि देहबोलीचा अभ्यास करून त्याच पद्धतीने संवाद साधत विश्वास संपादन करत होता. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून त्यावर तो नेमका प्रहार करत असे. या पद्धतीने तो महिलांना मानसिकदृष्ट्या जखडून ठेवत असल्याचा आरोप आहे. चौकशीत त्याने भावनिक जाळं विणून विश्वास मिळवल्याची कबुली दिल्याचीही माहिती समोर येत आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: किती महिलांचे शोषण केले हे सांगता येणार नाही

दरम्यान, किती महिलांचे शोषण केले याबाबत विचारले असता खरातने स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. “नेमका आकडा सांगता येणार नाही,” असा दावा त्याने केल्याचे सूत्रांकडून कळते. आतापर्यंत त्याच्याविरोधात 10 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार

आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: खरातच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचाही मोठा धागा समोर येत आहे. विशेष तपास पथकाच्या प्राथमिक चौकशीत खरातने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पुढे आली आहे. विविध खात्यांतील काही वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींशी त्याचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काळा पैसा व्याजाने देणे आणि हवाला मार्गाने देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी केल्याचेही समोर आले आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा सविस्तर अहवाल आता अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रकरणातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने होण्याची चिन्हे आहेत. खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणाचे पडसाद आणखी मोठ्या पातळीवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

अकोल्यात बनावट नोटा चालनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 500 रुपयांच्या 194 नोटा जप्त, तीन आरोपींना अटक
अकोल्यात बनावट नोटा चालणात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 500 रुपयांच्या 194 नोटा जप्त, तीन आरोपींना अटक
Ulhasnagar : FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त
FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका, मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन रद्द
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका, मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन रद्द
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget