एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: डब्यातील 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A टू Z पर्यंत अक्षरं, 1 ते 26 अंक, हिरव्या रंगाचे द्रव्य...; अशोक खरातच्या कार्यालयातून महत्वाचे पुरावे जप्त

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. त्याआधी एसआयटीकडून अशोक खरातच्या कार्यलयात तपास केला.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक हादरवणारी माहिती समोर आली. अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. त्याआधी एसआयटीकडून अशोक खरातच्या कार्यलयात तपास केला. यावेळी एसआयटीने अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A टू Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थानचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचे पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीने जप्त केली आहे. (Ashok Kharat Case)

अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार- (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसाची  पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी तिसऱ्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन एसआयटीने पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यत त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला तिसरा  गुन्हाही महिलचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अशोक खरातने अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची प्रसुती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असे सांगत महिलेवर अत्याचार केला. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. याच अत्याचारच्या घटनेनंतर खरात चे बिंग फुटले आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले.

अशोक खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा- (Ashok Kharat Case Nashik Crime)

भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात, बोगस आयकर अधिकारी पाठवून, तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली. बोगस आयकर अधिकारी पाठवून खरातने स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; आरोपीला उद्या पुन्हा कोर्टात सादर करण्याचे आदेश, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget