एक्स्प्लोर

मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक

सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई वेगाने करण्यात आली.

नाशिक : जिल्ह्यातील (nashik) महिला लैंगिक प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्याने एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी केली होती, तब्बल 6 तास त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत तपास केला होता. त्यानंतर आता भोंदू खरातच्या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी (Police) शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे. 

सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई वेगाने करण्यात आली. खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली. 

अशोक खरात ला कालच सिन्नर पोलिसांनी अटक करून आज कोर्टात हजर केले होते, अशोक खरातच्या चौकशीत नामकर्ण आवारेचे नाव पुढे आल्यानं त्यास अटक करण्यात आली. नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे. नामकर्ण आवारे याने 'असा मी नामकर्ण' या पुस्तकात अशोक खरातची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने आवारे चर्चेत आला होता.

अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

अशोक खरातला आज सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज अशोक खरातला सिन्नर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे. जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडल्याने पोलिसांनी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणात आर्थिक सोर्स कोणता याचा पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे आणखी पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली. 

हेही वाचा

ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Embed widget