एक्स्प्लोर

Ashok Kharat : नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबाविरोधात 6 गुन्हे दाखल; आज न्यायालयात हजर करणार

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर बनत असून, त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) अधिकच गंभीर बनत असून, त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने दाखल झालेल्या तीन तक्रारींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश असल्याने प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, भविष्य सांगणे अशा विविध बहाण्यांखाली महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने विद्यार्थ्यांशीही गैरवर्तन केल्याचे उघड झाले असून, नव्या तक्रारींमुळे त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती अधिक वाढत आहे. त्यामुळे पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. दरम्यान, अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: 'शिवनिका संस्थान'च्या आर्थिक व्यवहारांवर संशय

या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आला आहे. ऑडिट रिपोर्टनुसार, 2020 ते 2022 दरम्यान संस्थानचे उत्पन्न केवळ 4.90 लाखांच्या आसपास होते, तर 1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूटही नोंदवली गेली होती.

मात्र, 2024 नंतर संस्थानच्या उत्पन्नात अचानक झपाट्याने वाढ झाली. तब्बल 76 लाख 91 हजार 416 रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले असून, खर्च वजा जाता 70.66 लाख रुपयांची शिल्लक राहिल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, संस्थानची मालमत्ता 2022 मधील 96 लाखांवरून 2025 पर्यंत 1 कोटी 81 लाखांपर्यंत वाढली आहे. बँकेत 23 लाख 35 हजार रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहितीही समोर आली आहे. या अचानक वाढलेल्या उत्पन्नाचा स्रोत काय, देणग्या कोणाकडून आल्या, याचा तपास आता केंद्रस्थानी आला आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: एसआयटी प्रमुखांचे आवाहन

दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत काही महत्त्वाची, उपयुक्त माहिती असल्यास खालील हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधावा, आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन SIT पथकाच्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

हेल्पलाईन नंबर: 9503270224, 7775816389.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget