एक्स्प्लोर

Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार अन्...; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया संतापल्या

Anjali Damania on Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टीकेचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, मात्र त्यांच्यावरील टीका अजूनही सुरू आहे.

मुंबई : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे अशोक खरात सोबतचे फोटो समोर आले, याप्रकरणावरून रूपाली चाकणकरांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले, यानंतर काल (शुक्रवारी, ता२०) चाकणकरांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आज या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांनी त्या पदावरती असताना काही प्रकरण दाबली आहेत का? याबाबतची देखील चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं की, काल रुपाली चाकणकारांनी राजीनामा दिला. महिला आयोग महिलांच्या न्यायासाठी असतात. पण यांचं अध्यक्ष पद खरात सारख्या माणसाला आधार देण्यात गेलं. माझ्याकडे महिलांच्या ५/६ केसेस आल्या आहेत. काल मी सुनील तटकरे यांची बॉडी लैंग्वेज पाहिली ते संतापून पळून गेले. पण तुम्ही किती ही पळणार, मी सोडणार नाही. हे सर्व ओशो जल घ्यायचे. मुख्यमंत्र्यांना आभार तुम्ही महिलांच्या डोक्यावर हात ठेवले, तुम्ही उपकार केले राजीनामा घेऊन असंही अंजली दमानियांनी म्हटलं आहे.

राजीनामा देताना पोझ देऊन उभ्या, चेहऱ्यावर....

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दलही बोलल्या. स्त्री म्हणून गेले 3 दिवस हा सगळा प्रकार घडताना त्या बघत होत्या, पण कोणतंही पाऊल उचललं नाही. महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं, पण 3 दिवसांनी जेव्हा कळस गाठला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण तो राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण रुपाला चाकणकर या तर जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, अशा शब्दांच दमानिया यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत दमानिया म्हणाल्या की, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तटकरे तिथून पळून गेले. त्यांची 'बॉडी लँग्वेज' बघता ते घाबरलेले दिसत होते. "तुम्ही कितीही पळा, पण आता आम्ही तुम्हाला आणि त्यांना सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला आहे. केवळ राजीनामा पुरेसा नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) करून सखोल चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा या संविधानिक पदावर असताना त्यांनी खरातविरुद्धच्या केसेस दाबल्या असतील, तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. अशोक खरातकडे जे जे राजकारणी जात होते आणि त्याचे 'ओष्णोजल' (अघोरी तीर्थ) घेत होते, त्या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. "या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी घाण केली आहे. आता हे राजकारण पूर्णपणे साफ करण्याची वेळ आली आहे," असे दमानिया यांनी संताप व्यक्त करताना सांगितले. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व बड्या व्यक्तींचे चेहरे समोर आणण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजीनामा घेण्यास खूप उशीर झाला

दमानिया यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यास सरकारने खूप उशीर केला आहे. हुंडाबळीची आणि महिला अत्याचाराची गंभीर प्रकरणे समोर आली असतानाच त्यांचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे आणि गौरी गर्जे यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये महिला आयोगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. पडद्यामागे अशा अनेक तक्रारी महिला आयोगाकडे येतात, पण आयोग त्यावर काहीही करत नाही. आयोगावर बसलेल्या लोकांना केवळ राजकारण करण्यात आणि मिरवण्यात रस असतो, त्यांना पीडित महिलांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते, अशी टीका त्यांनी केली.दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन करत म्हटलं की, यापुढे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती करू नका. राजकारण आणि महिला आयोग या दोन गोष्टी एकमेकांपासून लांब ठेवाव्यात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्रातील महिलांना खरोखर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर यापुढे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एखादी महिला आयपीएस (IPS) अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधीश (Retired Judge) यांचीच नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. 

पक्षीय पदावरूनही हकालपट्टीची मागणी

रुपाली चाकणकर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर कायम आहेत. त्यांना केवळ आयोगावरूनच नाही, तर या राजकीय पदावरूनही तातडीने हटवले पाहिजे, असेही दमानिया यांनी नमूद केले. अनेक मोठे राजकारणी (भाजपसह सर्वच पक्षांचे) अशोक खरातकडे 'ओष्णोजल' (अघोरी तीर्थ) घेण्यासाठी गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवत असत. शिर्डीच्या नावाखाली खरातच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या या सर्व राजकारण्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. विकास दिवटे नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येची केस शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती, जी नंतर बंद करण्यात आली.ही केस पुन्हा री-ओपन (Reopen) करण्याची गरज असून, त्याबाबत आपण पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना सविस्तर पत्र पाठवणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले. 

रुपाली चाकणकर यांच्या दाव्यावर प्रत्युत्तर

चाकणकर यांनी 'अनामिका कापल्याचा' दावा फेटाळून लावत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर दमानिया म्हणाल्या की, "तुम्हाला हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही." सुषमा अंधारे यांनी अनेक फोटो पुराव्यासह दाखवले आहेत, त्यामुळे त्यांनीच याचा सोक्षमोक्ष लावावा, असेही त्या म्हणाल्या."महाराष्ट्रातील महिलांसाठी आणि एका स्त्रीच्या सन्मानासाठी अशा व्यक्तीला पदावरून उचलून फेकून देणे हे माझे कर्तव्य होते आणि ते मी केले आहे," अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. दीपक केसरकर यांनी "खरात जे बोलायचे ते खरे व्हायचे म्हणून लोकांचा विश्वास होता" असे विधान केले आहे. यावर दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत, अशा भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या मानसिकतेचा निषेध केला आहे. सुनेत्रा पवार महिला आहेत त्यांनी यावर काहीही केलेलं नाही. तीन दिवस कळस झाला. तेव्हा त्यांनी राजीनामा स्वीकारला. राजीनामा देताना देखील मॉडेलिंग करतात असा फोटो त्यांनी काढला, काल राजीनामा देताना एक अहंकार होता, असंही पुढे अंजली दमानियांनी म्हटलं आहे. 

कुठलाही माणूस येतो आणि बोलतो ते खरं व्ह्ययचं. असं कसं होऊ शकतं, आपले नेते जातात या गोष्टींना आळा घातला पाहिजे हे नेत्यांना का समजल नाही. सगळे नेते, उपमुख्यमंत्री नेहमीच जातात, आपला धर्म कमजोर नाही. काळाराम मंदिराचे एक महाराज होते ते मंत्र बोलायचे ते ही चुकीचे होते. दीपक केसरकर यांचे अनेक वेगवेगळे फोटो पाहिले. चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत.धनंजय मुंडे आहेत, सुनीत तटकरे यांचे उठता बसता इथे फोटो आहेत हे एकदा चुकून गेलेले नाही त्यांचे संबंध होते. हे फार गंभीर आहे. राजकारणाला आता मुक्त केलं पाहिजे, असंही अंजली दमानियांनी म्हटलं आहे. 

जयंत पाटलांनी त्यांच्या काळात त्या संस्थेला पाणी आरक्षित केलं होतं. जयंत पाटील यांचं देखील नाव अनेक वेळा आलं आहे. रुपाली चाकणकर यांना कोणी वाचवत असेल तर एकच नाव समोर आलं ते म्हणजे सुनिल तटकरे. ज्या पदावर त्या होत्या, त्या पदावर एक गरिमा असते. त्या आपल्या पदराने पाय पुसतात तेव्हा संताप होतो. पांडुरंगाशी त्यांची तुलना करण्यात आली हे खूप लाज्जस्पद बोलणं होतं. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या ते आक्षेपहार्य आहे. संपदा मुंडेवर शिंतोडे उडवले तेव्हाच राजीनामा घ्यायला हवा होता. मी देखील ऐकलं आहे की ते अघोरी पूजा करायचे. पण पुरावे अजून आलेले नाहीत. काल दुपारनंतर त्यांनी सदानंद दाते यांची भेट घेऊन चौकशी केली पाहिजे. चोर बोलतोय चोरीचा तपास झाला पाहिजे. दाते हुशार आहेत त्यांना कळलं असेल कोण चुकीचं आहे, असंही अंजली दमानियांनी म्हटलं आहे. 

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget