एक्स्प्लोर

Amravati Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणी आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Amravati Murder Case : इरफान शेख याला आज अमरावती न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Amravati Murder Case : व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान शेख याला न्यायालयात हजर केले होते. इरफान शेख याला न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला पोलिसांनी शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या होत्या. त्याला आज न्यायालयात हजर केले होते. कोर्टाने त्याला आता सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अमरावती पोलिसांनी इरफान शेखला कोर्टात हजर करताना आपली बाजू मांडली. या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख याची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला त्याची कस्टडी मिळाली, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणात पोलिस पैशाचा काही प्रकार आहे का? याचाही शोध घेत आहे. इरफान शेख ज्या रहबरिया  एनजीओचा सदस्य होता, त्याची बँक डिटेल्स पोलीस एकत्र करत आहेत.  दरम्यान, इरफान शेख याच्याकडे येणाऱ्या पैशांची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करावी लागेल, त्यामुळे त्याची कस्टडी आम्हाला मिळावी, असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला. 

व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणातील दुचाकीही पोलिसांनी अद्याप मिळालेली नाही. त्याशिवाय, पोलील एका कारचाही शोध घेत आहे, या कारचा वापर हत्यानंतर फरार होण्यासाठी करण्यात येणार होता. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आरोपी इरफान शेख याच्या वकिलानेही कोर्टात युक्तीवाद केला. ते म्हणाले की, व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली तेव्हा इरफान शेख तिथे उपस्थित नव्हता. बँक खात्याच्या तपशीलासाठी पोलीस बँकेकडून एक कॉपी घेऊ शकते, त्यामुळे आरोपीला पोलिसी कस्टडची गरज नाही. 

कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर कोर्टाने इरफान शेख याला सात जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. 

काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण हत्येशी संबंध नाही"
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget