एक्स्प्लोर

Amravati Crime News: परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदची इन्स्टाग्रामवर प्रचंड 'क्रेझ', अटक होताच फॉलोअर्स धडाधड वाढले

Amravati Crime News: परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढत असतानाच सोशल मीडियावर त्याची 'क्रेझ' वाढताना दिसत आहे.

Amravati Crime News: अमरावतीच्या (Amravati) परतवाडा (Paratwada) येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आला असून, विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती मोठे तांत्रिक पुरावे लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढत असतानाच सोशल मीडियावर त्याची 'क्रेझ' वाढताना दिसत आहे.

Amravati Crime News: तांत्रिक तपासात मोठे यश

एसआयटीने या प्रकरणात जप्त केलेल्या पाचपैकी तीन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात तांत्रिक विभागाला यश आले आहे. या मोबाईलमधील चॅट्स आणि डेटावरून संशयितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक वेगाने कारवाई करत असून, लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Amravati Crime News: सोशल मीडियावरील 'फॉलोअर्स' वाढल्याने आश्चर्य

मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच, त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या वाढणे चिंताजनक मानले जात आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा अयानचे 18 हजार फॉलोअर्स होते, मात्र अटकेनंतर अवघ्या काही दिवसांत त्यात 4 हजारांची भर पडून हा आकडा 22 हजारांच्या पार गेला आहे. समाजविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीची ही वाढती 'क्रेझ' वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.    

Amravati Crime News: आतापर्यंत 10 संशयितांना अटक

अयान अहमद आणि त्याचा मित्र उजैर खान यांनी केवळ शोषण केले की पीडित मुलींच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणीही केली होती? या दिशेने आता एसआयटीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आतापर्यंत 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर स्थानिक धार्मिक नेतृत्वानेही स्पष्ट भूमिका घेतली आहे. परतवाडा येथील शहर-ए-काजी सय्यद गैसोद्दीन यांनी अयान अहमदच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. "आरोपी कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुस्लिम समाजाने अशा गुन्हेगाराला पाठीशी न घालता त्याच्या शिक्षेसाठी पाठिंबा द्यावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.

Amravati Crime News: काय म्हणाले पोलीस अधीक्षक?

दरम्यान, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद या प्रकरणाची माहिती दिली आहे. 15 वर्षाच्या तरुणीचा आम्ही ऑन रेकॉर्ड जबाब घेतला आहे. यावेळी तरुणीची आई सोबत होती. आठ पिडीत पैकी एका पिडीतीने जबाब दिला आहे. ही तपासासाठी चांगली गोष्ट आहे. आरोपी क्रमांक दोन उजेर खान याच्या विरोधात एका 16 वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यामुळे एक वेगळा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही जे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिक्स हस्तगत केले ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. ज्या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी थार गाडीत बसत आहे, त्यात बंदूक ठेवली, नोटांचे बंडल दिसत आहे. ती गाडी राजेश प्रजापती यांची आहे. तो प्रजापती कोण आहे? आणि अयान सोबत त्याचे काय संबंध आहे? याचा तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

आणखी वाचा 

Rohini Khadse: सूरतमध्ये गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतलं, सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई पुणेसारख्या शहरातही अशीच अवस्था होईल; रोहिणी खडसेंचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget