एक्स्प्लोर

Ambarnath : अंबरनाथ पालिकेत खळबळ, महासभेदरम्यान कारमध्ये सापडली हत्यारे; नगरसेवक वाळेकर यांना संपवण्याचा कट, भाजपचा गंभीर आरोप

Ambarnath News : अंबरनाथ नगरपालिकेची महासभा सुरू असताना पालिकेबाहेरील गाडीत हत्यारे सापडल्याप्रकरणी आता राजकीय वातावरण तापले आहे.

ठाणे : अंबरनाथ नगरपालिकेची महासभा सुरू असताना पालिका आवाराबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीत घातक हत्यारे सापडल्याच्या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर राजकीय वळण लागले आहे. त्या दिवशी नगरसेवक पवन वाळेकर यांना संपवण्याचा संघटित टोळीचा कट होता, असा धक्कादायक आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश गोरे यांचा सहभाग असून त्यांना मुख्य आरोपी करण्याची थेट मागणी नगरसेवक पवन वाळेकर यांनी केली आहे.

BJP Delegation Meets ACP : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न; व्हिडीओ पुरावा सादर

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि भाजप गटनेते अभिजित करंजुले यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

पोलिसांशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपने दावा केला की, "गाडीत हत्यारे सापडली तेव्हा योगेश गोरे यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणला आणि गाडीतील आरोपी आपलेच असल्याचे पोलिसांना सांगितले." याबाबतचा एक व्हिडीओ पुरावा म्हणून भाजप शिष्टमंडळाने पोलिसांना दाखवला आहे. अंबरनाथमध्ये यापूर्वीही अनेक नगरसेवकांना संपवण्यात आलं असून, त्या दिवशी पवन वाळेकर यांनाही संपवण्याचा कट रचला गेला होता, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

Police FIR Controversy : आकाश वाळेकरांऐवजी पोलिसाला फिर्यादी का केले?

नगरसेवक पवन वाळेकर यांनी या प्रकरणातील पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "हत्यारं असलेल्या गाडीबाबतची माहिती सर्वात आधी आकाश वाळेकर यांनी पोलिसांना दिली होती. असे असतानाही या प्रकरणात फिर्यादी म्हणून आकाश यांचे नाव न नोंदवता एका पोलीस कर्मचाऱ्याला फिर्यादी का करण्यात आले?" असा थेट सवाल वाळेकर यांनी विचारला आहे.

या प्रकरणात शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश गोरे यांना सह-आरोपी करून निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी त्यांनी लावून धरली आहे.

Police Assurance ACP Shailesh Kale : एसीपी शैलेश काळे यांचे आश्वासन

भाजप शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) शैलेश काळे यांनी भाजपच्या सर्व मागण्या आणि दिलेल्या व्हिडीओ पुराव्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणात सर्व बाजूंनी सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, भाजप आणि नगरसेवक पवन वाळेकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांबाबत त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते योगेश गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी अद्याप प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Pradeep Purnekar and Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
Nagpur Fake Currency News: नागपुरतील बनावट नोटांच्या कथित प्रकरणात नवी माहिती समोर; स्थानिकांचा खळबळजनक दावा, पुष्पम बंडाने मात्र अद्याप फरारच
नागपुरतील बनावट नोटांच्या कथित प्रकरणात नवी माहिती समोर; स्थानिकांचा खळबळजनक दावा, पुष्पम बंडाने मात्र अद्याप फरारच
Advertisement

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...

Embed widget