एक्स्प्लोर

Alandi VIDEO : चोरट्या सेवेकऱ्याकडे दिली होती दानपेटीची चावी; आळंदी देवस्थानची मोठी कबुली, सुरक्षेचा बोजवारा

Alandi Temple Theft : विश्वस्तांच्या कबुलीमुळे आळंदी देवस्थानचा अत्यंत गंभीर हलगर्जीपणा आणि सुरक्षेचा उडालेला बोजवारा आता चव्हाट्यावर आला आहे.

Alandi Temple Theft Case : आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील (Sant Dnyaneshwar Maharaj Temple Alandi) मुख्य दानपेटीतून विश्वासू सेवेकऱ्यानेच लाखो रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणानंतर आता आळंदी देवस्थानला अखेर जाग आली. मंदिरातील कोणत्याही अधिकृत कामासाठी नियुक्त न केलेला विशाल वारुळे नावाचा संशयित व्यक्ती थेट मुख्य दानपेटीतील रक्कम जमा करण्याचं काम करत होता याची देवस्थानला अजिबात कल्पना नव्हती, अशी धक्कादायक कबुली देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी दिली आहे.

विश्वस्तांच्या या मोठ्या कबुलीमुळे आळंदी देवस्थानचा अत्यंत गंभीर हलगर्जीपणा आणि सुरक्षेचा उडालेला बोजवारा आता चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात एवढा मोठा निष्काळजीपणा कसा झाला, असा संतप्त सवाल आता वारकरी आणि भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

Donation Box Security : देवस्थानचा ढिसाळ कारभार उघड

मंदिराच्या सुरक्षेचे आणि पैशांच्या हिशोबाचे कोणतेही नियम न पाळता एका अनधिकृत व्यक्तीच्या हातात दानपेटी खोलण्याची आणि त्यातील रोख रक्कम गोळा करण्याची जबाबदारी कशी दिली गेली, याचे उत्तर सध्या देवस्थानकडे नाही. या गंभीर प्रकारामुळे मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेमुळे आळंदी परिसरात वारकरी संप्रदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Alandi Devasthan Notice : कॅशियरसह व्यवस्थापकाला 'कारणे दाखवा' नोटीस

या संपूर्ण चोरीच्या प्रकरणानंतर आणि देवस्थानवर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देवस्थानने मंदिराचे मुख्य कॅशियर महेश गोखले यांच्यासह मंदिर व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य आचाऱ्याला या प्रकरणी तात्काळ लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.

Strict Temple Rules : आळंदी ग्रामस्थांसमोर कठोर नियमावली जाहीर

चोरीच्या या मोठ्या राड्यानंतर आळंदी देवस्थानने स्थानिक ग्रामस्थांची आणि प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भविष्यात अशा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी देवस्थानकडून अत्यंत कठोर नियमावली (Strict Rules) जाहीर करण्यात आली आहे. मंदिरातील प्रत्येक कर्मचाऱ्याची आणि सेवेकऱ्याची आता कडक तपासणी केली जाणार असून, पैशांच्या व्यवहाराच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे.

Demand For Strict Action : केवळ नोटीस नको, तर कडक कारवाईची मागणी

दरम्यान, आळंदीतील स्थानिक नागरिक आणि भाविकांमधून अशी मागणी केली जात आहे की, देवस्थानने केवळ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस देऊन भागणार नाही. लाखो भाविकांच्या दानावर डल्ला मारणाऱ्या आणि या चोरीला अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरलेल्या सर्व जबाबदार दोषींवर कडक कायदेशीर कारवाई (Strict Legal Action) व्हायला हवी. तरच भविष्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र मंदिरामध्ये अशा लाजिरवाण्या घटनेची पुनरावृत्ती टळू शकेल.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Embed widget