Ajit Pawar, Baramati : "मी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. ते म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही..एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो. परंतु अमानुषपणे तिथे गोष्टी घडलेल्या आहेत. या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटनेमुळे शरमेन मान खाली जाते", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते.
अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची क्रुरतेने हत्या करण्यात आली. तिथे मी त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी मी गेलो होत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं. काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. कोणाला भयभीतपणे जगतोय असं कोणलाही वाटता कामा नये. मी आज देखील तुम्हाला सांगतो आम्ही तिघांनीही यामध्ये लक्ष घातलेलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी परदर्शकतेला साथ द्यायचं ठरवलं आहे
3 मार्चला अर्थसंकल्प मला सादर करायचा आहे. उद्या मी पुण्यात आहे. मी परवा जाऊन चार्ज घेणार आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांची गरज लागली तर मदत घेऊन काम करू. काही कार्यकर्ते काम घेतात आणि नेते दुसऱ्याला विकतात असले धंदे बंद करा. मुख्यमंत्र्यांनी परदर्शकतेला साथ द्यायचं ठरवलं आहे. मलिदा गँग म्हटले गेले..1980 साली शरद पवारांना खताळ पट्टाने विरोधात मतदान केलं होतं. परंतु 88% मत मला याच गावाने मत दिली. जे काम करतात ते राहतात बाजूला जे पुढारी येतात सांगतात दादा हे झालं पाहिजे आणि ते झालं पाहिजे. मी डोक्याला सांगत होतो 23 पर्यत थांब, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
महाराष्ट्रामधील जनतेने भुतो न भविष्यती असं यश दिले
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी कार्यकर्त्यांना त्यांच्या बरं वाटावे म्हणून ते बोलत राहिले. लोकसभेला 48 हजारांनी माझा उमेदवार मागे होता. कार्यकर्ता कामाला लागला. कुणावरही टीका टिपणी करायची नाही. आम्ही मतदारांना आवाहन करत होतो. मतदारांनी, महाराष्ट्रामधील जनतेने भुतों न भविष्यती असं यश दिले. काँग्रेस एकतर्फी असताना देखील कधी एवढा कौल मिळाला नव्हता तेवढा आता दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या