अहमदनगर : शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून शेतकरी कुटुंबाला गावगुंडाकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातल्या चिंभळे (Chimbhale) गावात घडली आहे. मारहाण करणारे गावगुंड गावात मोकाट फिरत असल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या चिंभळे गावात शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून एका शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून धमकावण्यात आले. त्यानंतर गावगुंडांकडून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. 


गावगुडांवर कारवाई होत नसल्याचा आरोप 


मारहाणीत शेतकरी राहुल गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत असून  अल्पवयीन मुलगा आणि राहुल गायकवाड यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहेत. तिघांवर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीची घटना होऊन चार दिवस झाल्यानंतरही पोलीसांनी गावगुडांवर काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मारहाण करणारे गावगुंड गावात मोकाट फिरत असल्याचे शेतकरी कुटुंबियांचे म्हणणे आहे. गावगुंडांना तत्काळ अटक करण्याची मागणी  कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


केस पकडून फरफटलं, चाकूनं सपासप केले वार; PG मध्ये घुसून तरुणीवर जीवघेणा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO


बेकायदेशीररित्या गर्भपात करणारा डॉक्टर गजाआड! रत्नागिरीतील जिल्हा शल्य चिकित्सक आणि  ग्रामीण पोलिसांची कारवाई