अहमदनगर : नाशिकच्या मनमाड (Manmad) येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या बोगस एफडी प्रकरणानंतर अहमदनगर (Ahmednagar News) येथील एका मल्टीस्टेट निधी बँकेकडून ठेवेदारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नगरच्या ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड (Dhyeya Multistate Nidhi Limited) या बँकेने 113 ठेवीदारांच्या 5 कोटी 74 लाखांच्या ठेवींची फसवणूक केली आहे. नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये (Tofkhana Police Station Ahmednagar) सात संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 


जास्त व्याजदराचं आमिष दाखवून सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँका नागरिकांच्या ठेवी मिळवत आहेत. नागरिकाही मोठ्या व्याजदराच्या आमिषाला बळी पडून आपल्या काबाड कष्टाच्या रकमा अशा मल्टीस्टेट बँकांमध्ये ठेवत आहेत. मात्र यातील काही बँका मोठा परतावा काय ठेवलेल्या रक्कमही परत करत नाहीत. असाच प्रकार अहमदनगर येथील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेने केल्याचं समोर आलं आहे. 


5 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक, सात संचालकांवर गुन्हा


काही वर्षांपूर्वीच निर्माण झालेल्या ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेने 14.40 टक्के व्याजदर देण्याचे बॅनर लावले. तसा व्याजदरही ग्राहकांना दिला. नगर शहरातील सुजाता नेवसे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेली 3 लाख 75 एवढी रक्कम चांगलं व्याज मिळेल या उद्देशाने ध्येय मल्टीस्टेट निधी बँकेत ठेवली. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर बँकेतून पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना काहीच मिळालं नाही. नेवसे यांच्या प्रमाणेच जिल्ह्यातील 112 जणांना या बँकेने 5 कोटी 74 लाख रुपयांना फसवल्याचं समोर आलं आहे. ठेवीची मुदत पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळाने पोबारा केला आहे. त्यामुळे ठेवीदार आता हवालदिल झाले असून पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवत आहेत. नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सात संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 


विमा प्रतिनिधीकडून करोडोंचा गंडा


दरम्यान, नाशिकमधील (Nashik News) मनमाड येथे विमा प्रतिनिधीनेचा ठेवीदारांना करोडोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. युनियन बँकेत (Union Bank) हा प्रकार उघडकीस आला. युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने बँकेच्या मुदत  ठेवीदारांचे चांगले दाबे दणाणले आहेत. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) असे अपहार करणाऱ्या विमा प्रतिनिधीचे नाव असून त्याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले व स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केल्याचे ठेवीदारांचा आरोप आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आणखी वाचा 


Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला