एक्स्प्लोर

Nida Khan: फरार निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड, 'लेडी मास्टरमाइंड'ला पकडण्यासाठी एसआयटीकडून पुणे-मुंबईत झाडाझडती

Nida Khan: पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच जामीन मिळवण्यासाठी निदा खानने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे.

नाशिक: नाशिकमधील नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार (Mastermind) मानली जाणारी संशयित आरोपी निदा खान  21 दिवसांपासून फरार असून, अटक टाळण्यासाठी तिने आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच जामीन मिळवण्यासाठी निदा खानने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे.

Nida Khan:  एसआयटीकडून तपासाचा फास आवळला

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपला तपास अधिक तीव्र केला आहे. निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके भिवंडी, मुंबई, पुणे आणि नाशिकमधील संभाव्य ठिकाणांवर रवाना झाली आहेत. यापूर्वी पोलिसांनी नाशिक आणि पुण्यातील काही संशयास्पद ठिकाणांची झडती घेतली, मात्र निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. गरोदर असल्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानकडून जामीनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निदा खानच्या अटकपूर्व जमीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान अद्याप फरार असून, नाशिक पोलिसांचे पथक तिच्या मागावर आहे. निदाच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे. 

Nida Khan: धर्मांतरासाठी तरुणींवर टाकला दबाव

निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना हेरून, त्यांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकणे, असे कृत्य ती करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, निदा खानच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.

तरुणींच्या धर्मांतरासाठी वापरण्यात येणाऱ्या या 'मोडस ऑपरेंडी'मुळे नाशिकसह राज्यभरात संतापाची लाट आहे. निदा खानने जामिनासाठी अर्ज केला असला, तरी पोलीस या अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध करण्याची शक्यता आहे. ती वारंवार आपली ठिकाणे बदलत असल्याने तिला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान (Nida Khan) ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. 

गेला वीस दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या (Nida Khan) मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे, मात्र अद्यापही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. या कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान (Who Is Nida Khan) ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. 

Who Is Nida Khan:  कोण आहे निदा खान?

नाव - निदा एजाज खान 
वय - 26 वर्ष 
- कंपनीतील टीम लीडर ची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
- 2021पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती. 
- नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे.
- कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे. 
- आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती.
- या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
- निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
- या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिचे तीन पथक निदा खानच्या मागावर असून तपास सुरू आहे.

Nida Khan : निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील पण...

निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणे कडून व्यक्त केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

Embed widget