Aadhar and Ration Card Link : जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रेशन कार्ड योजनेनुसार, सरकारकडून नागरिकांना अनेक फायदे मिळतात. दरवर्षी 80 कोटी नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत अथवा स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध होते. कोरोना महासाथीनंतर सरकारने लोकांना मोफत रेशन गहू, तांदूळ, डाळीचे वाटप केले आहे. आता ही योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 


'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना


केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार, अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. या योजनेतंर्गतच्या रेशन कार्डमुळे देशातील कोणत्याही राज्यातून रेशन व्यवस्थेचा फायदा मिळू शकतो. तुम्ही अद्यापही रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर तातडीने लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


आधार कार्ड आणि रेशन कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येऊ शकतील.  


ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड आणि आधार कार्ड कसे लिंक कराल?


- आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागणार. 
- 'Start Now'पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला पत्ता विचारला जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा, राज्य आणि अन्य माहिती नमूद करावी लागेल
- त्यानंतर  Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक आदी माहिती मागितली जाईल, ती नमूद करा
- तुमच्या Registered Mobile क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी नमूद करा
- ओटीपी नमूद केल्यानंतर रेशन कार्ड लिंकची प्रक्रिया पूर्ण होईल


ऑफलाइन पद्धतीने कसे लिंक कराल?


आधार कार्ड आणि रेशन कार्ड ऑफलाइन पद्धतीने लिंक करू इच्छिता तर, तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्डची एक एक झेरॉक्स प्रत आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन रेशन कार्ड केंद्रावर जावे लागेल. ही कागदपत्रे, माहिती तिथं नमूद करावीत. त्यानंतर तुमचा बायोमेट्रीक डेटा व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले जाईल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइवल क्रमांकावर याचा मेसेज येईल. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha