Aadhar Card : सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासह अनेक ठिकाणी आधार कार्ड अर्निवार्य आहे. आता याच आधार कार्ड अपडेटबाबत केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे. 27 मे रोजी सरकारने आधार कार्डाबाबत एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डचा फोटो कुणालाही शेअर करू नका, असे सांगण्यात आले होते. यामुळे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे सरकारकडून सागण्यात आलं होतं. परंतु, सरकारने नुकतेच आपले म्हणणे मागे घेतले आहे. 


निवेदन का मागे घेण्यात आले?
तुमच्या आधार कार्डचा फोटो कुणालाही शेअर करू नका असे  केंद्र सराकारकडून आज सकाळीच सांगण्यात आलं होतं. परंतु, सरकारने आपली ही सूचना मागे घेतली आहे. याबाबत सरकारने नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे. निवेदन मागे घेण्यामागे 'चुकीचा अर्थ' असण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे. नव्याने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्याबाबतचा चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता लक्षात घेऊन आपला आदेश तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक नोटीस जारी केली आहे की, आधार कार्ड धारकांना ते वापरण्यापूर्वी आणि इतर कोणाला शेअर करण्यापूर्वी काळजी घ्यावी लागेल. आपला आधार क्रमांक कोणाशीही शेअर करण्यापूर्वी प्रथम पूर्ण तपासणी करावी. 


 सरकारने आपल्या आधीच्या निदवेदना काय म्हटले होते? 
आज सकाळी केंद्र सरकारने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशवासियांना त्यांच्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसोबत शेअर न करण्याचे आवाहन केले होते.  27 मे रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली  होती. ज्या संस्थांनी UIDAI कडून वापरकर्ता परवाना घेतला आहे,  ते कोणत्याही व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकतात. याशिवाय हॉटेल्स किंवा फिल्म्ससारख्या खासगी संस्थांना आधार कार्डच्या झेरोक्स ठेवून घेण्याचा अधिकार नाही, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.