SSC Result 2022: आंध्र प्रदेश माध्यमिक बोर्डने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये परीक्षेला बसलेल्या सहा लाख विद्यार्थ्यांपैकी दोन लाखाहून जास्त विद्यार्थी हे नापास झाले आहेत. यामध्ये तीन पैकी एक मुलगा नापास झाला आहे तर मुलींचं प्रमाण थोडसं कमी असल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 64 टक्के विद्यार्थी हे पास झाले आहेत. 

Continues below advertisement

आंध्रमध्ये एकूण 6,15,908 विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4,17,285 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये 3,16,820 मुलांपैकी 2,02,821 मुलं पास झाली. तर 2,99,085 मुलींपैकी 2,11,460 मुली पास झाल्या. पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण हे 64.02 टक्के इतकं आहे तर मुलींचे प्रमाण हे 70.07 टक्के इतकं आहे. 

महाराष्ट्रात बारावीचा निकाल उद्याराज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल."

Continues below advertisement

उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.