Khelo india youth games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेतील बॅटमिंटन खेळामध्ये महाराष्ट्राच्या (मुंबई) दर्शन पुजारी याने तामिळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन सेट्समध्ये पराभूत करत सुवर्ण पदका मिळवलं आहे. यावेळी पहिल्या सेटमध्ये 21 विरूद्ध 15 असा तर दुसरा सेट 22 विरूद्ध 20 या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे.


बॅडमिंटन खेळाचा हा अंतिम सामना ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये रंगला होता. यावेळी सामन्यात दर्शनने सुरुवातीपासून दमदार खेळाची झलक दाखवली. त्याने सुरुवातीपासून आक्रमक खेळाचं दर्शन घडवलं. तामिळनाडूच्या ऋत्विकने देखील चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण दर्शनच्या भेदक माऱ्यासमोर ऋत्विक टीकू शकला नाही. ज्यामुळे पहिल्या सेटमध्ये दर्शनने 21-15 च्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ऋत्विकने कडवी झुंज देत 20 गुणांपर्यंत मजल मारली. पण दर्शनने 22 गुण मिळवत सेट आणि सामना जिंकला.  


क्रीडामंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा


महाराष्ट्राच्या दर्शनने हरियाणाच्या मैदानावर केलेल्या या सुवर्ण कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनीही दर्शनचं कौतुक केलं. सामन्यापूर्वी केदार यांनी सकाळी व्हिडिओ कॉल करून सुवर्णपदकासाठी दर्शनला शुभेच्छा दिल्या होत्या. चांगला खेळून सुवर्णपदक घेऊन ये. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मनावर कोणतेही दडपण घेऊ नको, पदक तुझच आहे. बिनधास्त खेळ, असं केदार म्हणाले होते.


हे देखील वाचा- 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.