Worlds Most Expensive Fish : अलिकडच्या काळात तरुण मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. तर काही तरुण नोकरी सोडून व्यवसायाची वाट धरत आहेत. असाच एक पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे मत्स्यव्यवसाय. मत्स्यव्यवसायात (Fisheries) लोक मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. दरम्यान, तुम्हाला जगातील सर्वात महाग मासा कोणता? (Worlds Most Expensive Fish) याबाबतची माहिती आहे का? जाणून घेऊयात जगातील सर्वात महाग माशाबद्दल सविस्तर माहिती. 


अटलांटिक ब्लूफिन ट्यूना जगातील सर्वात महाग मासा


जगभरात माशांच्या अनेक प्रजाती आढळतात. यामध्ये काही मासे दुर्मिळ प्रजातीचे असतात. त्यांच किंमत मोठी असते. आज आपण जगातील सर्वात महागड्या माशाबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या माशाची किंमत करोडो रुपये आहे. जगातील सर्वात महाग मासा हा इतर माशांपेक्षा वेगळा आहे. अटलांटिक ब्लूफिन ट्यूना असं जगातील सगळ्या महाग असणाऱ्या माशाचे नाव आहे. हा मासा मौल्यवान समजला जातो. खूप कमी प्रमाणात या माशाची प्रजाती आढळते. ही प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.


अटलांटिक ब्लूफिन ट्यूना माशाची किंमत किती?


अटलांटिक ब्लूफिन ट्यूना हा मासा जगातील सर्वात मौल्यवान आणि महाग मासा आहे. या माशाची किंमत करोडो रुपयांची आहे. या माशाचे वय 40 वर्षाच्या आसपास असते. तर याचे वजन हे  200 किलोपेक्षा जास्त आहे. काही वर्षापूर्वी जपानमध्ये या ब्लूफिन ट्यूनासाठी बोली लागली होती. यावेळी 210 किलो वजनाचा मासा हा 2 लाख 70 हजार अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीला विकला गेला होता. भारतीय रुपयामध्ये बोललो तर याची 2 कोटी 20 लाख रुपये आहे. 


काही देशांमध्ये हा मासा पकडणे गुन्हा


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काही देशांमध्ये हा मासा पकडणे गुन्हा आहे. अटलांटिक ब्लूफिन ट्यूना हाजगातील सर्वात मोठ्या माश्यांपैकी एक आहे. हा मासा प्रशांत महासागरासह उत्तर धुव्रीय समुद्रात आढळतो. समुद्राच्या खोल भागात हा मासा आढळतो. ही प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा अधिक वेगाने पोहोतो. दरम्यान, या माशाची किंमत एकूण अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण हे खरं आहे. या माशाची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Whale : खोल समुद्रात असणारे महाकाय व्हेल किनाऱ्यावर का येतात? जाणून घ्या कारण