Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोशल मीडियावर (Social Media) सातत्याने अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम स्टोरीच्या (Instagram Story) माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करताना दिसते. चाहतेही तिच्या पोस्टला तुफान प्रतिसाद देत असतात. मात्र, तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुष्मिताने एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाला आहे. देशाभरात राम मंदिरामुळे (Ram Mandir) उत्साहाचे वातावरण होते. त्यातच सुष्मिताच्या (Sushmita Sen) एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 


काय म्हणाली सुष्मिता सेन? (Sushmita Sen)


राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यानंतर सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीला भारतीय संविधानाची प्रस्तावना शेअर केली होती. फिल्ममेकर अतुल मोंगियानेही हिच पोस्ट शेअर केली होती. सुष्मिताने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "भारत! माझे माझ्या देशावर प्रेम आहे. कोणतेही द्वेषाचे राजकारण या प्रेमाला बदलू शकणार नाही." पुढे इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, "मातृभूमी" सोबतचं हार्ट आणि हात जोडणारी इमोजीही शेअर केली होती. 


सुष्मिताच्या पोस्टवर चाहते भडकले (Sushmita Sen)


अभिनेत्री सुष्मिता सेनने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट राम मंदिराबाबत (Ram Mandir) केली असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलंय. राम मंदिराला सुष्मिताने एकप्रकारे विरोध केला असल्याचे मत नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यांनने सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "सुष्मिता सेन (Sushmita Sen) पीएचडी लेवलची मूर्ख असेल, कारण ती राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला द्वेषपूर्ण म्हणत आहे. ही स्वत: द्वेषपूर्ण आहे. कारण लोकांच्या भावना हिला समजत नाहीत."


याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराची (Ram Mandir) निर्मिती झाली आहे. सुष्मितासाठी हे द्वेषपूर्ण राजकारण आहे. तिच्यावर उदारमताचा इतका प्रभाव पडला आहे की, ती मुघलांनी हिंदू धर्माच्या प्रतिकांवर केलेले आक्रमण विसली आहे." 







इतर महत्वाच्या बातम्या


Pune international film festival : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'राहगीर - द वेफरर्स' चित्रपटाचे थाटात पार पडले स्क्रिनिंग!