Bank Holiday: बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण पुढील चार दिवस काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार (Bank Holiday) आहेत. त्यामुळं यासंदर्भातील यादी तपासूनच बँकांच्या संदर्भातील व्यवहार करावेत. देशातील अनेक राज्यांमध्ये 25 ते 28 जानेवारीपर्यंत बँकांना सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने सुट्ट्यांची यादी आधीच प्रसिद्ध केली आहे. 

Continues below advertisement


'या' राज्यांमध्ये बँका राहणार बंद 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, थाई पोशम आणि हजरत मोहम्मद अली यांच्या वाढदिवसानिमित्त आज म्हणजेच गुरुवारी, दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी चेन्नई, कानपूर, लखनऊ आणि जम्मूमध्ये बँका बंद राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त  26 जानेवारीला देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे. याशिवाय 27 जानेवारीला महिन्यातील शेवटचा शनिवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तर 28 जानेवारीला रविवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं ज्या लोकांना बँकांच्या संदर्भातील कामं करायची आहेत, त्यांनी ही यादी एकदा तपासून घेणं महत्वाचं ठरणार आहे. 


बँकांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं करु शकता


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारीला चेन्नई आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं या दोन राज्यामध्ये चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तर इतर राज्यांमध्ये सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर बँकेच्या सुट्टीची यादी तपासा. तुम्ही बँकांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं करु शकता. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा स्थितीत बँक दीर्घकाळ बंद असताना ग्राहकांची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत.


नवीन तंत्रज्ञानामुळं ग्राहकांना अडचण येणार नाही


दरम्यान, नवीन तंत्रज्ञानामुळं ग्राहकांना बँकेतून रोख रक्कम काढणं आणि ट्रान्सफर करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहक UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकतात. एटीएममधून पैसे काढता येतात. सुट्टीच्या दिवशीही या दोन्ही सेवा सुरू राहतील.


26 जानेवारीला देशभरातील बँकांना सुट्टी राहणार


उद्या म्हणजेच 26 जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत. मात्र, आज (25 जानेवारी) थाई पोशम आणि हजरत मोहम्मद अली यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नई, कानपूर, लखनऊ आणि जम्मूमध्ये बँका बंद राहणार आहेत.


महत्वाच्या बातम्या:


सरकारी बँकांसांठी एक दिलासादायक बातमी, 3 बँकांनी 3 महिन्यांत कमावले 6498 कोटी रुपये