मुंबई : गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात (Share Market) कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. आज सेन्सेक्सने  74000  अंक पार केले आङेत. तर दुसरीकडे Nifty देकील 22,500 अंकांवर आहे. शेअर बाजारात काही विभाग तर असे आहेत ज्यांनी अविश्वसीनीय तेजी दाखवत गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. दरम्यान, येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालावर शेअर बाजाराची स्थिती अवलंबून असणार आहे. या दिवशी अनेकांने पैसे बुडू शकतात तर अनेकांना या दिवशी मोठा फायदा होऊ शकतो. दरम्यान, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास कोणकोणत्या क्षेत्रातील शेअर्स मुसंडी मारू शकतात याबाबत  मॅक्झिमायझरचे संस्थापक योगेश मेहता यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत.  


बिझनेस टुडेशी बोलताना योगेश मेहता यांनी आगामी काळात भारतीय शेअर बाजारात नेमके काय होऊ शकते, यावर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार 4 जूनपर्यंत NSE म्हणजेच निफ्टी इंडेक्स 21,700 ते 22,800 अंक राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 1.87 टक्के घसरण झाली होती.   


या स्केटरमध्ये मिळू शकतात दमदार रिटर्न्स


मेहता यांच्या मतानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा सत्तेत आल्यास रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्च, डिफेन्स, इलेक्ट्रिकसिटी, पब्लिक सेक्‍टर्स (पीएसयू) आदी क्षेत्रात मोठी तेजी येऊ शकते. या कंपन्यांत पैसे लावलेल्यांना चांगले रिटर्न्स मिळू शकतील. 


याआधी गुंतवणूकदार मालामाल 


वर नमूद केलेल्या सेक्टर्सनेय याआधीही गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर  अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स  आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स सारख्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी 17 मे 2023 पासून आतापर्यंत अनुक्रमे साधारण 124 आणि 194 टक्यांनी वाढ नोंदवली आहे.  NIBE लिमिटेड, भारत डायनऍमिक्स, डेटा पॅटर्न, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या शेअर्सनेदेखील अनुक्रमे 298, 92, 81 आणि 35 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 


पीएसयू स्टॉक्सचीही दमदार कमाई 


गेल्या एका वर्षात पीएसयू कंपन्यांनीही शेअर बाजारावर चांगली कामगिरी केली आहे. पीएसयू सेक्टरमधील 50 पेक्षा अधिक कंपन्यांनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. यातील कोचीन शपयार्ड या कंपनीने 16 पर्यंत 386 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. IRFC, आयएफसीआय, HUDCO, REC आदी कंपन्यांनी 300 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दाखवलेली आहे. त्यामुळे मेहता यांच्या सांगण्यानुसार गुंतवणूकदार संरक्षण, उर्जा, बँकिंग क्षेत्रातील स्टॉक्स खरेदी करू शकतात. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


पैसे कमवण्याची संधी चुकवू नका, नव्या आठवड्यात दोन नवे आयपीओ येणार!


क्रेडिट कार्डवरील 16 अंकी क्रमांकाचा नेमका अर्थ काय? सीव्हीव्ही नंबर काय? जाणून घ्या


या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? चार दिवसांत शेअर बाजारात मालामाल होण्याची संधी, वाचा सविस्तर...