या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? चार दिवसांत शेअर बाजारात मालामाल होण्याची संधी, वाचा सविस्तर...
या आठवड्यात एकूण चार दिवस शेअर बाजार चालू असणार आहे. बाजार फक्त चार दिवस चालू असला तरी पैसे कमवण्याची नामी संधी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. याची सुरुवात 22 मेपासून होणार आहे. बुधवारी म्हणजेच 22 मे रोजी एक्स-डिव्हिडेंड होणाऱ्या शेअर्समध्ये एवांटेल (0.20 रुपये), ग्रेट ईस्टर्न शिपिंग (10.8 रुपये), हाय एनर्जी बॅटरीज (3 रुपये), केन्नामेटल (30 रुपये), ओबेरॉय रिअॅलिटी (2 रुपये), पोन्नी शुगर्स (7 रुपये), शेषासायी पेपर (5 रुपये) आणि सुला विनयार्ड (4.5 रुपये) यांचा समावेश आहे.
बुधवारीच कोलगेटचा शेअर एक्स- डिव्हिडेंड होणार आहे. कोलगेट कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 26 रुपयांचा अंतरिम लाभांश आणि 10 रुपयांचा विशेष लाभांश देत आहे. यासह बुधवारी एसबीआयचा (13.7 रुपये) शेअरही एक्स-डिव्हिडेंड होणार आहे.
टाटा समुहाच्या ट्रेंट (3.2 रुपये) या कंपनीचे शेअरही एक्स-डिविडेंड होणार आहे. टाटा समुहाच्या कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचा शेअर 24 मे रोजी एक्स-डिव्हिडेंड होतोय. या कंपनीत गुंतवणाऱ्यांना 7.75 रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. .
वेदांता कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना 11 रुपयांचा अंतरिम लाभांश दिला जाईल. या कंपनीचा शेअर शुक्रवारी एक्स-डिव्हिडेंड होतोय. याच शुक्रवारी क्यूजीओ फायनान्स कंपनीचा शेयर एक्स-डिव्हिडेंड होईल. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 0.15 रुपये रुपयांचा अंतरिम लाभांश देत आहे. याच आठवड्यात भारत डायनॅमिक्स आणि सोम डिस्टिलरीजचे शेअर्स एक्स-स्प्लिट होणार आहेत. याच आठवड्यात मार्बल सिटी इंडिया या कंपनीची ईजीएम होणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)