क्रेडिट कार्डवरील 16 अंकी क्रमांकाचा नेमका अर्थ काय? सीव्हीव्ही नंबर काय? जाणून घ्या
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण या क्रेडिट कार्डवर असलेल्या 16 अकांचा नेमका अर्थ अनेकांना माहिती नसतो. याच पार्श्वभूमीवर क्रेडिट कार्डवरील 16 अक असलेल्या क्रमांकाचा अर्थ काय असतो, ते जाणून घेऊ या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रेडिट कार्डच्या 16 अंकी नंबरवरील पहिला अंक हा फार महत्त्वाची माहिती देतो. 16 अंकी क्रमांकातील पहिल्या अंकाच्या मदतीने मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायरला (MII) ओळखता येते. म्हणजेच तुमचे क्रेडिट कार्ड नेमकं कोणत्या कंपनीने जारी केलं आहे हे यातून समजतं. तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर 4 या अंकापासून चालू होत असेल तर ते Visa या कंपनीने जारी केलेले असते. तुमच्या कार्ड नंबरची सुरुवात 5 पासून होत असेल तर त्याला Mastercard ने जारी केलेलं आहे, असं समजावं. तुमचे क्रेडिट कार्ड हे रुपे क्रेडिट कार्ड असेल तर त्याची सुरुवात ही 6 पासून होते. .
क्रेडिट कार्डच्या पहिल्या सहा अंकांतून इश्यूअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच IIN नंबर समजतो. काही ठिकाणी याला बँक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच BIN नंबरही म्हटलं जातं. कार्डच्या पहिल्या सहा अंकांच्या मदतीने तुमचे क्रेडिट कार्ड नेमकं कोणत्या बँकेने किंवा कोणत्या फायनॅन्शीयल इन्स्टिट्यूटने जारी केले आहे, हे समजते.
क्रेडिट कार्ड क्रमांकातील 7 ते 15 हे अंक तुमच्या क्रेडिट कार्डचा अकाऊंट नंबर सांगतात. हा अकाऊंट नंबर ज्यांनी तुम्हाला कार्ड दिले आहे, त्या बँक किंवा फायनॅन्शीयल इन्स्टिट्यूटकडे असतो.
क्रेडिट कार्डच्या 16 अंकांतील शेवटचा अंक हा चेक डिझिट असतो. या एका नंबवरून संपूर्ण क्रेडिट कार्डचे व्हॅलिडेशन होते. तुमच्या कार्डचा गैरवापर तर होत नाही ना, याची खात्री हा शेवटचा नंबर करतो.
क्रेडिट कार्डवर 16 अंकी कार्ड नंबरसह एक्सापयरी डेट असते. अनेक क्रेडिट कार्ड्सवर एक्सपायरी डेट ही महिना आणि वर्षाच्या स्वरुपात असते.
क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही नंबरही तेवढाच महत्त्वाचा असतो. याला अनेक ठिकाणी कार्ड व्हेरिफिकेशन कोड, कार्ड व्हेरिफिकेशन नंबर म्हटलं जातं. हा क्रमांक कार्डच्या पाठीमागे सिग्नेचर स्ट्रीपच्या शेवटी लिहिलेला असतो. या सीव्हीवी क्रमांकाच्या मदतीनेदेखील या कार्डचा गैरवापर केला जात नाही ना, याची खात्री केली जाते. त्यामुळे अनेकवेळा ऑनलाईन ट्रान्झिशन करताना तुम्हाला सीव्हीव्ही नंबर विचारला जातो.