मुंबई : शेअर बाजारात (Share Market) या आठवड्यात चांगल्या कमाईची संधी आहे. कारण या आठवड्यात दोन आयपीओ (IPO) येत आहेत. या आयपीओंत गुंतवणूक करून चांगले पैसे कमवता येऊ शकतात. गेल्या आठवड्यातदेखील काही आयपीओ आले होते. यामध्ये हरिओम आटा तसेच रुल्का इलेक्ट्रिकल्स या आयपीओचा समावेश आहे. या आठवड्यात दोन आयपीओंसह 8 नव्या कंपन्यांचे समभाग शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. ऑफिस स्पेस सॉल्यूशन्स आणि जीएमएम फॉइल्स हे दोन आयपीओ या आठवड्यात येणार आहेत.
या आयपीओंत गुंतवणूक करण्याची अजूनही संधी
रुल्का इलेक्ट्रिकल्स हा एसएमई आईपीओ 16 मे रोजी खुला झाला होता. हा आयपीओ 21 मे रोजी बंद होणार आहे. तर 24 मे रोजी हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. आतापर्यंत या आयपीओला 33.66 पटीने सबस्क्राईब करण्यात आलंय. हरिओम आटा या कंपनीचा 5.54 कोटी रुपयांचा एसएमई आयपीओ 16 मे रोजी खुला झाला होता. या आयपीओत 21 मेपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 24 मे रोजी हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. या आयपीओला 204.56 पटीने सबस्क्रीप्शन मिळाले आहे.
ऑफिस स्पेस सोल्यूशन्स आयपीओ
ऑफिस स्पेस सोल्यूशन्सचा (Awfis Space Solutions IPO) आयपीओ साधारण 600 कोटी रुपायांचा आहे. हा एक मेनबोर्ड आयपीओ असून तो 22 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 27 मेपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. 30 मे रोजी हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. या आयपीओचा किंमत पट्टा 364-383 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओच्या माध्यमातून 128 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. यासह 470.93 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत केली जाईल. आयपीओतून जमा झालेल्या पैशांतून ऑफिस स्पेस सोल्यूशन्स ही कंपनी स्वत:च्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे.
जीएसएम फॉइल्स आयपीओ
जीएसएम फॉइल्स आयपीओ (GSM Foils NSE SME IPO) 24 मे रोजी खुला होणार असून त्यात 28 मे पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. हा 11.01 कोटी रुपयांचा आयपीओ आहे. तो शेअर बाजारावर 31 मे रोजी सूचिबद्ध होणार आहे. तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर 4000 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मोठी बातमी! IDFC चे लवकरच IDFC फस्ट बँकेत विलीनीकरण, समभागधारकांचीही मंजुरी
एका वर्षांत मिळाले 420 टक्के रिटर्न्स, 'या' कंपनीचे शेअर्स तुम्हालाही करू शकतात मालामाल!
नावाला पेनी स्टॉक, पण ठरतोय शेअर बाजारातील किंग, 'या' कंपनीच्या शेअरने दिले 3400 टक्के रिटर्न्स!