Oldest Company of India: भारतात असे काही घराणे आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अब्जावधी रुपये किंमत असलेले उद्योग उभारले आहेत. या उद्योगांमुळे हे घराणे संपूर्ण जगभरात ओळखले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्योगविश्वात टाटा आणि अंबानी या दोन कुंटुंबांनी तर उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. आता अंबानी आणि अदाणी या दोन कुंटुंबानी वेगवेगळ्या उद्योगांत आपली छाप सोडली आहे. यासह भारतीय उद्योगविश्वात गोयंका, नादार, प्रेमजी, गोदरेज आदी मोठे उद्योगसमूह आहेत. मात्र देशातील सर्वाधिक जुन्या उद्योग समुहात यापैकी एकाही घराण्याचा समावेश नाही. देशातील सर्वांत जुनं उद्योजग घराणं होण्याचा मान दुसऱ्याच उद्योग समुहाला आहे.
हे आहे जगातील सर्वांत जुंन उद्योगक घराणं
देशातील सर्वाधिक जुना उद्योग समूह म्हणून वाडिया ग्रुपचे (Wadia Group) नाव घेतले जाते. वाडिया उद्योग समुहाचा इतिहास साधारण 300 वर्षे जुना आहे. साल 1736 मध्ये लवजी नुसरवानजी वाडिया (Lovji Nusserwanjee Wadia) यांनी गुजरातच्या सुरतमध्ये वाडिया उद्योग समुहाची स्थापना केली होती. जहाज बांधणी आणि निर्मिती उद्योगात ते फार प्रसिद्ध होते. इस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात लवजी यांनी मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. लवजी यांना जहाज बांधणी आणइ मुंबईतील पहिल्या डॉकनिर्मितीचे कंत्राट मिळाले होते. त्यांनी सुरुवातीला घेतलेल्या कठोर मेहनतीनंतर आता वाडिया ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
वाडिया उद्योग समुहाचे भांडवली बाजार मूल्य 1.20 लाख कोटी
वाडिया उद्योग समुहाचे बाजार मूल्य आज 1.20 लाख कोटी रुपये आहे. या उद्योग समुहाच्या बॉम्बे डायिंग (Bombay Dyeing), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries) आणि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन (Bombay Burmah Trading Corporation) या तीन कंपन्या 100 पेक्षा अधिक वर्षांपासून शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत. बॉम्बे डायिंग या कंपनीची स्थापना 1879 मध्ये झाली. ही टेक्सटाइल इंडस्ट्रीतील एक दिग्गज कंपनी आहे. 1892 साली ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली. या कंपनीकडून डेअरी प्रोडक्ट्सचीन निर्मिती केली जाते. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग या कंपनीची स्थापना 1863 साली झाली. या कंपनीकडून प्लांटेशन, हेल्थकेअर, रियल एस्टेट क्षेत्रात काम केले जाते.
हेही वाचा :
बजेट सादर होताच 'हे' तीन स्टॉक तुम्हाला करणार श्रीमंत? वाचा सविस्तर
तब्बल 3.50 लाख रुपये किलोंचा आंबा, बागेत लावला CCTV; भारतातल्या 'या' आंब्याची जगभरात चर्चा!
अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होणार का? केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर?