मुंबई: आर्थिक संकटाचा सामना करत असलेली देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला (Vodafone-Idea) बाहेर काढण्यासाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी कंपनीच्या बोर्डाने इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. असे असतानाही गुंतवणूकदारांना बोर्डाचे हे पाऊल अपुरे वाटत असल्याचं स्पष्ट झालंय. बोर्डाच्या निर्णयानंतर पुढच्याच ट्रेडिंग सत्रात व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये (Vodafone Idea Stock Price) मोठी घसरण झाली. बुधवारी या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी घसरला.


शेअर 14 टक्क्यांनी घसरला


बुधवारी सकाळी 15.50 रुपयांवर शेअर उघडला पण त्यानंतर शेअरमध्ये विक्री झाली आणि दिवसभराच्या व्यवहारात शेअर 14 टक्क्यांनी घसरला आणि बाजार बंद होताना शेअर 13.65 रुपयांच्या घसरणीसह बंद झाला. 13.88 टक्के.


ब्रोकरेज हाऊसने केले डाउनग्रेड


अनेक ब्रोकरेज हाऊसेसने शेअरला डाऊनग्रेड ठरवून गुंतवणूकदारांना तो विकण्याचा सल्ला दिल्याने शेअरमध्येही घट दिसून येत आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊसने व्होडाफोन आयडियाचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे आणि शेअरची लक्ष्य किंमत 5 रुपये केली आहे. आणखी एका ब्रोकरेज हाऊस नोमुराने देखील 7 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.


45 हजार कोटींचा निधी अपुरा पडणार? 


व्होडाफोन आयडियाच्या समभागातही घट झाली आहे कारण 45,000 कोटी रुपयांचा निधी उभारणे कंपनीसाठी अपुरे असल्याचे सांगितले जात आहे. कारण कंपनीवर 2.14 लाख कोटी रुपयांचे एकूण कर्ज थकित आहे. कंपनीने मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की, गोळा केलेला निधी 4G कव्हरेजचा विस्तार आणि 5G सेवेच्या रोलआउटवर खर्च केला जाईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने आधीच 5G सेवा सुरू केली आहे. परंतु निधीच्या कमतरतेमुळे, व्होडाफोन आयडिया अद्याप ते करू शकले नाही.


व्होडाफोन आयडियाने  स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या कंपनीच्या बैठकीत त्यांनी इक्विटीद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. मंडळाने निधी उभारणीची कसरत पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ, बँकर आणि वकील नियुक्त करण्यास व्यवस्थापनाला मान्यता दिली आहे. 2 एप्रिल 2024 रोजी कंपनीच्या भागधारकांची बैठक होणार आहे, त्यामध्ये निधी उभारणीसाठी मंजुरी घेतली जाईल. शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर इक्विटी फंड उभारण्याची प्रक्रिया येत्या तिमाहीत पूर्ण केली जाईल


ही बातमी वाचा: