पुणे : महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे  यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा असं म्हणत केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी वखवखलेला आत्मा म्हणत प्रत्युत्तर दिलं. 


महाराष्ट्र हुकूमशाहच्या कचाट्यात जाऊ देणार 


उद्धव ठाकरेंनी म्हटलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना फक्त अभिवादन करून चालणार नाही. ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत.  महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात असताना ते आपल्याकडे बघत आहेत.  मी शपथ घेऊन सांगू इच्छितो तुम्ही मर्द म्हणून गोळ्यांना सामोरे गेलात. आम्ही आता हा हुकूमशाह महाराष्ट्रात फिरतोय त्याच्या कचाट्यात प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरेंचं भाषण, पाहा व्हिडीओ



सुप्रिया सुळेंचं कौतुक


उद्धव ठाकरेंनी यावेळी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं. माझं ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो. तु तर मुलगी आहेस, महिला आहेस.  तुझं कौतुक करायला पाहिजे, असे प्रसंग यातना देणारे असतात. तु पहाडासारखी वडिलांना बरोबर उभी राहिलीस, असं म्हणत ठाकरेंनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं. 


नरेंद्र मोदींची काल पुण्यात रेसकोर्सवर सभा झाली, ठिकाण योग्य होतं रेसकोर्स कारण त्यांना झोपेमध्ये घोडेबाजार दिसतो. कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत. तुम्ही ज्यांना घेतलं ते घोडे नाहीत ती खेचरं आहेत. खरे घोडे अश्वमेध असतात. टरबुजला हातगाडी लागते, घोडे नाही लागत, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली .


लहान भाऊ होता तर नातं का तोडलंत?


माझ्या आणि मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. 2014 आणि 2019 ला मोदींना महाराष्ट्रात इतक्या वेळी यावं लागलं नव्हतं. त्या संभांमध्ये तुम्ही लहान भाऊ होतो असं म्हणला होता तर नातं का तोडलंत?, असा सवाल नरेंद्र मोदी यांना केला.  


अजित पवार म्हणाले की ते पुढच्या सभेत त्यांना विचारेन की भटकती आत्मा कुणाला म्हणालात ते,  भटकती आत्मा म्हणालात, कुणाला? पवार साहेबांना? वखवखलेला आत्मा पण असतो.  तो सगळीकडे जातो आणि म्हणतो पवारसाहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतात, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय असा आरोप करतात. पण मुख्यमंत्री करायला जनतेची मतं लागतात, एका फोनवर शाहंनी मुलाला बीसीसीआयचं सचिव केलंय तसं मुख्यमंत्रीपद नाही. वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरतोय, किती सभा घेत आहेत. पण तुम्हाला जरा संवेदना असतील तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याकडे बघा, त्यांच्या पत्नींच्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राची परंपरा शुरांना वंदन करायची आहे. भाजपचे सध्या चोर आम्ही वंदिले असे सुरु आहे.  ३००-३५० वर्षा पूर्वी असाच एक वखवखलेला आत्मा आला होता महाराष्ट्र राज्यावर चालून, औरंगजेब परत कधी गेलाच नाही, अजूनही भटकत असेल इकडे, असंही ठाकरे म्हणाले. 


संबंधित बातम्या : 


Uddhav Thackeray: महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे


महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात