Fuel Prices : विमान प्रवाशांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे. आता विमानाचा प्रवास (Air Travel) महागणार आहे. कारण मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी विमानाच्या इंधन दरात वाढ झालीय. एका बाजूला एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किंमती कमी झाल्या असतानाच दुसऱ्या बाजूला विमानाच्या इंधन दरात वाढ झालीय. याचा थेट फटका विमान प्रवाशांना बसणार आहे.
विमानाच्या इंधनात नेमकी किती झाली वाढ?
सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला विमान इंधनाच्या किंमतीत वाढ झालीय. त्याचा परिणाम विमान भाड्यावर होणार आहे. म्हणजे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून विमानाच्या इंधन दरात प्रति किलो 749.25 रुपयांची वाढ झालीय.
दर महिन्याला विमानाच्या इंधनाच्या दरासंदर्भात आढावा
दर महिन्याला तेल आणि वायू कंपन्या या विमानाच्या इंधनाच्या किंमतीसंदर्भात आढावा घेत असतात. त्यानंतर बाजारातील परिस्थितीनुसार इंधनाच्या किंमतीसंदर्भात कंपन्या निर्णय घेतात. मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत इंधनाचे दर कमी आहेत, तर कोलकातामध्ये सर्वात जास्त इंधनाचे दर आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात विमान इंधनाच्या किंमती कमी झाल्या होत्या. तर मार्च महिन्यात इंधनाचे दर वाढले होते. मार्च महिन्यापूर्वू सलग चार महिने विमान इंधनाचे दर घसरत होते.
महत्वाच्या बातम्या: