मुंबई : या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपला जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने तरुण, महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब, शेतकरी या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून आपला जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही सत्तेत आल्यास देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिले. 

देशात नव्या तीन बुलेट ट्रेन आणणार 

मोदी यांनी देशात तीन नव्या बुलेट ट्रेन तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत अशा भारताच्या तीन भागांत एक-एक बुलेट ट्रेनचे देण्यात येईल, असेही आश्वासन मोदींनी दिले.  

मुद्रा योजनेतून दिले जाईल 20 लाख रुपयांचे कर्ज 

गेल्या काही वर्षांत आम्ही कोट्यवधी लोकांना उद्योजक करण्याचं काम मुद्रा योजनेनं केलेलं आहे. या योजनेमुळे कोट्यवधी लोकांना नोकरी मिळालेली आहे. लाखो लोक रोजगार देणारे झालेले आहेत. या योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंतचे लोन मिळायचे. आता मात्र ही मर्यादा आम्ही 20 लाखांपर्यंत केले जाईल. सध्या छोट्या उद्योगांची गरज आहे. या छोट्या उद्योगांच्या उभारणीसाठी आमचे हे पाऊल मदतीला येईल. तरुणांना त्यांच्या आवडीचे काम करण्यासाठी आणखी जास्त पैसे मिळतील. तरुणांची व्याजाच्या पैशांतून मुक्ती होईल.

  • नरेंद्र मोदी यांनी आम्ही सत्तेत आल्यास गरिबांना पुढची पाच वर्षे मोफत रेशन दिलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
  • 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आयुष्मान भारत योजनेत केला जाईल. अशा नागरिकांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जाईल, असेही मोदी म्हणाले.
  • आगामी काळात आम्ही आणखी तीन कोटी लोकांना पक्की घरे बांधून देऊ, असंही आश्वासन मोदींनी दिलं.
  • सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या तीन देशांत भारताचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणार, असं आश्वासन मोदी यांनी दिली. 
  • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांसाठी दिव्यांग लोकांना प्राधान्य देण्यात येणार, असंही आश्वासन मोदींनी दिलं. 

  • तृतीयपंथीयांवर उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केला जाणार, 

  • घरातील वीजबील शून्यावर कसे येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार

  • सहकार धोरणाला चालना देण्यात येणार, दूध डेअर, सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यात येईल. 

  • स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांना आयटी, शिक्षण, स्वास्थ्य,पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे रोजगारनिर्मिती होईल.

दरम्यान, भाजपने आपल्या या जाहीरनाम्यात आपल्या जुन्या योजनांचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. महिला, तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. देशाची अर्थव्यवस्था कशी वाढेल, यावरही आम्ही काम करू, असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे मोदी सत्तेत आल्यास या आश्वासनांची अंमलबजावणी होणार का? भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

कोट्यधीश उद्योगपतीने हे काय केलं? संपूर्ण संपत्ती दान करून घेतला धक्कादायक निर्णय!

पाकिस्तान हैराण! महागाईमुळे कंबर मोडली, जगणं सर्वाधिक महाग; छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोकांचा संघर्ष!

छोटा पॅकेट बडा धमाका! 8 महिन्यांपूर्वी पैसे गुंतवणारे आज कोट्यधीश, 'या' कंपनीनं दिले तब्बल 1400 टक्के रिटर्न्स!