मुंबई : गेल्या महिनाभरात अनेक आयपीओ आले आहेत. यातील काही आयपीओंनी (New IPO) गुंतवणूकदारांना भरघोस परातावा दिला आहे. तर काही आयपीओंमध्ये गुंतवणूक केल्यामुळे लोकांचे पैसेदेखील बुडाले आहेत. दरम्यान, या आठवड्यात भांवडली बाजारात (Share Market) उलथापालथ घडवून आणणारे दोन महत्त्वाचे आयपीओ येत आहेत. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करणं आवडत असेल तर या दोन आयपीओंत पैसे गुंतवून पैसे कमवण्याची नामी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. 


हे दोन आयपीओ येणार, गुंतवणुकीची चांगली संधी


या आठवड्यात येणारे हे दोन्ही आयपीओ लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई श्रेणीतील आहेत. रामदेवबाबा सॉल्ह्वंट आणि ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस लिमिटेड अशी या दोन्ही आयपीओंची नावे आहेत. याच आठवड्यात तीर्थ गोपीकॉन आणि डीजीसी केबल्स अँड वायर्स हे दोन आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. 


रामदेवबाबा सॉल्ह्वंट आयपीओ


पुढच्या आठवड्यात 15 एप्रिल रोजी रामदेवबाबा सॉल्ह्वंट (Ramdevbaba Solvent IPO) हा एसएमई आईपीओ येणार आहे. 18 एप्रिलपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 50.2 कोटींचा निधी उभारणार असून त्यानंतर तो एसएमई मंचावर सूचिबद्ध होणार आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे 80-85 रुपये असणार आहे. या आयपीओचा 50 टक्के भाग हा  संस्थात्मक गुंतवणूकदार, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदार तसेच 15% गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. या कंपनीकडून खाद्यतेलाची निर्मिती, वितरण केले जाते. 


ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ 


ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस लिमिटेड (Grill Splendour Services IPO) ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 16.5 कोटी रुपये उभारणार आहे. 15 एप्रिल रोजी हा आयपीओ खुला होणार असून तो 18 एप्रिल रोजी बंद होणार आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे 120 रुपये असणार आहे. गुंतवणूकदारांना एका स्लॉटमध्ये 1,200 शेअर्स खरेदी करावे लागतील. या आयपीओचा 50% भाग हा आरक्षित आहे. उर्वरित 50% हिस्सा हा अन्य गुंतवणूकदारांसाठी खुला आहे. या कंपनीची मुंबईत17 रिटेल स्टोअर्स, एक सेंट्रलाइज्ड प्रोडक्शन यूनिट आहे. 


हेही वाचा :


कामगार ते उद्योगपती, ख्रिश्चन ते हिंदू! रहीमला वाचवण्यासाठी जमवले तब्बल 34 कोटी, 'ब्लड मनी' देऊन होणार सुटका!


रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!


छोटा पॅकेट बडा धमाका! 8 महिन्यांपूर्वी पैसे गुंतवणारे आज कोट्यधीश, 'या' कंपनीनं दिले तब्बल 1400 टक्के रिटर्न्स!