गांधीनगर : मनुष्य सुख समृद्धीसाठी आयुष्यभर संघर्ष करत असतो. जास्तीत जास्त पैसे कमवून जगातील सर्व सुख अनुभवण्यासाठी तो धडपडत असतो. काही लोकांना या श्रीमंतीवर एवढं प्रेम असतं, की ते आयुष्याच्या शेवटपर्यंत पैशाच्या मागे लागलेले असतात. सध्या मात्र गुजरातमध्ये (Gujarat) एका कोट्यधीशाने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्यक्तीने आपली कोट्यवधीची संपत्ती दान करत चक्क संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीसोबत त्याची बायकोदेखील संन्यास घेणार आहे. 


200 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय


गुजरातमधील भावेश भाई भंडारी (Bhavesh Bhai Bhandari) यांनी त्यांची तब्बल 200 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मुळचे साबरकाठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी भौतिक सुखाचा त्याग करत आपल्या पत्नीसोबत एका संन्याशासारखे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भाई भंडारी हे एका श्रीमंत कुटुंबातून येतात. या जगातल्या सर्व सोईसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत होत्या. मात्र आता त्यांनी ही सर्व श्रीमंती, ऐश्वर्य त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंखे, एसी, मोबाईल फोन असं सगळंकाही सोडून दिलं आहे. यासह त्यांनी संपूर्ण भौतिक सुखाचाही त्याग केला आहे. 


दोन मुलं याआधीच झाले संन्यासी 


भावेश भाई भंडारी यांचा साबरकांठा आणि अहमदाबाद येथे बांधकामाचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायातून ते दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवतात. मात्र त्यांच्या 16 आणि 19 वर्षाच्या अनुक्रमे मुलगा आणि मुलीने याआधीच संन्यास घेतलेला आहे. आपल्या मुलाच्या निर्णयाने प्रेरित होत आता या भंडारी दाम्पत्यानेही भौतिक सुख सोडण्याचा निर्णय घेतलाय. 


22 एप्रिलपासून करणार नव्या आयुष्याला सुरुवात


हिम्मतनगर येथे एक भव्य यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत एखूण 35 लोकांनी संन्याशाचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. याच यात्रेत भावेश भाई यांनी त्यांची 200 रुपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार भावेश भाई आपल्या संन्यासी आयुष्याची सुरुवात येत्या 22 एप्रिलपासून करणार आहेत.


हेही वाचा :


पाकिस्तान हैराण! महागाईमुळे कंबर मोडली, जगणं सर्वाधिक महाग; छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोकांचा संघर्ष!


अश्नीर ग्रोव्हर इज बॅक! आणलं 'Zero Pay' नावाचं नवं अॅप, नेमकं काय आहे यात?


रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!