एक्स्प्लोर

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा फी वाढीनंतर तातडीनं अमेरिकेत पोहोचण्याचे आदेश, USA च्या अधिकाऱ्याकडून गुड न्यूज, म्हणाले...

H-1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा फी वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या कंपन्यांनी H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत दाखल होण्याचे आदेश दिले होते. 

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची वार्षिक फी 1लाख अमेरिकन डॉलर केली आहे. यानंतर अमेरिकेतील भारतीय आयटी कर्मचारी आणि कंपन्यांमध्ये मधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत परतण्याचा सल्ला दिला होता. मायक्रोसॉफ्टनं त्यांच्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबरपूर्वी दाखल होण्यास सांगितलं होतं.मात्र, एका अमेरिकन अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार H-1B व्हिसाधारक भारतीयांनी घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.

अमेरिकेचे अधिकाऱ्यानं शनिवारी म्हटलं की, H-1B व्हिसाधारक भारतीयांना रविवारीपर्यंत अमेरिकेत परतण्याची गरज नाही. त्यांना अमेरिकेत परत येण्यासाठी 1 लाख डॉलर भरावे लागणार नाहीत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की ट्रम्प सरकारचा नवा नियम केवळ नव्यानं होणाऱ्या व्हिसा अर्जांसाठी असेल. ज्या लोकांकडे पहिल्यापासून H-1B व्हिसा आहे ते व्हिसाचं नुतनीकरण करत आहेत. त्यांच्यावर नवी फी लागू राहणार नाही.  

भारतीयांवर सर्वाधिक परिणाम

अमेरिकेतील H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक परिणाम भारतीय कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कारण, H-1B व्हिसाधारकांमध्ये 70 टक्के भारतीय आहेत. यामुळं टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत दाखल होण्यासाठी सांगितलं आहे.  

कंपन्या काळजीत, थोडासा दिलासा

मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि जेपी मॉर्गन या सारख्या दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेला परतण्याचा इशारा दिला होता. मात्र, अमेरिकेच्या अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.  

कंपन्यांकडून इशारा  

व्हिसा फी वाढीच्या बातमीनंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि जेपी मॉर्गन यासारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सल्ला दिला होता. या कंपन्यांनी जे कर्मचारी अमेरिकेबाहेर आहेत त्यांनी तातडीनं परत यावं असं सांगितलं होतं. जे H-1B व्हिसाधारक सध्या अमेरिकेत आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा, असं सांगण्यात आलं होतं. सध्याची H-1B व्हिसाची फी 1000 अमेरिकन डॉलर्स ते 5000 डॉलर्स दरम्यान आहे. मात्र, नवं धोरण लागू झाल्यानंतर ती फी  1 लाख डॉलर होईल.  या निर्णयानंतर सर्वाधिक परिणाम भारतीय आयटी कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. कारण, H-1B व्हिसाधारकांमध्ये 70 टक्के भारतीय कर्मचारी आहेत. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Sharad Pawar and Sunetra Pawar: बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Embed widget