एक्स्प्लोर

Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ; भारतावर परिणाम?

Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला असून व्याज दरात 0.75 टक्के वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम जागतिक शेअर बाजारातही दिसण्याची शक्यता आहे. 

अमेरिकेतील महागाईने मागील 41 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील महागाईचा दर 9.1 टक्के आहे. महागाई दराचे आकडे समोर आल्यानंतर व्याज दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील व्याज दर हा 1994 नंतरचा सर्वाधिक व्याज दर आहे. मागील पतधोरण आढावा बैठकीतही फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्क्यांची वाढ केली होती.

फेडरल ओपन मार्केट कमिटीने सांगितले की, अमेरिकेत महागाईचा दर वाढला आहे. कोरोना महासाथीचा आजार,  खाद्यान्नांचे वाढलेले दर, महागडी ऊर्जा आदींचा परिणाम व्याज दरांवर दिसून येत आहे. सध्या मागणी आणि पुरवठामध्ये असंतुलन असल्याने महागाई दिसून येत आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की,  अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी वाढते व्याज दर हे जोखीम निर्माण करू शकतात. आर्थिक मंदीबाबत फेडरल रिझर्व्हने फारशी चिंता व्यक्त केली नाही.

वर्षात चार वेळेस व्याज दरात वाढ

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने मागील सव्वा महिन्याच्या कालावधीत व्याज दरात 1.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याशिवाय, या वर्षात चौथ्यांदा व्याज दर वाढ करण्यात आली आहे. 

भारतावर परिणाम?

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर भारतावरही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे व्याज दरात वाढ होऊन कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. तर,  डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारावरही  फेडरल रिझर्व्ह व्याज दराचा परिणाम दिसून येऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टच्या निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगणार, भारतातील कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं
मायक्रोसॉफ्टच्या एका निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, भारतात मायक्रोसॉफ्टचे किती कर्मचारी? 
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
Embed widget