एक्स्प्लोर

चुकीच्या खात्यावर UPI पेमेंट केलात तर पैसे परत मिळतात का? 'या'पेक्षा जास्त वेळ केलात तर मोठं नुकसान

UPI Transaction Complaint Process : बऱ्याच वेळा आपण घाईगडबडीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो. रक्कम जर मोठी असेल तर आपल्याला त्याचा फटका बसू शकतो.

UPI Wrong Payment Rules : डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Payments) UPI मुळे व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतात. मात्र हीच वेगवान प्रक्रिया कधी कधी मोठी अडचण ठरते. चुकीचा नंबर, चुकीची UPI ID किंवा रकमेतील एखादा अंक जास्त-उणे झाला, तर पैसे थेट अनोळखी खात्यात जातात. अशावेळी घाबरून न जाता तात्काळ योग्य पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेत तक्रार केली तर पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.

मोठी रक्कम चुकीच्या खात्यात गेल्यास चिंता अधिक वाढते. कारण UPI व्यवहार थेट रिव्हर्स (Reverse) होत नाहीत. मात्र योग्य वेळी योग्य प्रक्रिया केल्यास नुकसान टाळता येऊ शकते.

त्वरित तक्रार करा (Immediate Complaint Process)

चुकीचा UPI ट्रान्झॅक्शन (UPI Wrong Transaction) झाल्यास विलंब न करता तक्रार करणे महत्त्वाचे आहे. समोरची व्यक्ती पैसे परत देत नसेल, तर ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधा. चुकीचा व्यवहार झाल्यानंतर शक्यतो 3 तासांच्या आत तक्रार करणे फायदेशीर ठरते. जितक्या लवकर तक्रार, तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त.

रिसीव्हरचे खाते फ्रीज करा (Freeze Receiver Bank Account)

जर रक्कम चुकीच्या खात्यात गेली असेल, तर त्या खात्याला फ्रीज (Account Freeze) करण्याची प्रक्रिया सुरू करता येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती त्या पैशांचा वापर करू शकत नाही. खाते ब्लॉक झाल्यानंतर कोणतेही ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्यवहार करता येत नाहीत.

1930 हेल्पलाइनवर संपर्क (Cyber Crime Helpline 1930)

खाते फ्रीज करण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवता येते. व्यवहाराची संपूर्ण माहिती दिल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते. तसेच आपल्या बँकेत लेखी तक्रार करून किंवा रिसीव्हरच्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही रक्कम सुरक्षित करता येते.

NPCI पोर्टलवर तक्रार (NPCI Grievance Portal)

जर अॅप किंवा बँकेमार्फत समस्या सुटली नाही, तर NPCI ग्रिव्हन्स पोर्टलवर (NPCI Grievance Portal) ट्रान्झॅक्शन ID टाकून तक्रार नोंदवता येते. तक्रारीनंतर मिळालेल्या रेफरन्स नंबरद्वारे स्टेटस ट्रॅक करता येतो.

सावधगिरीचाच सर्वोत्तम उपाय (Digital Payment Safety Tips)

भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी QR कोड स्कॅन करूनच पेमेंट करा. रक्कम टाकताना दोनदा तपासा. स्क्रीनवर दिसणारे रिसीव्हरचे नाव नीट वाचा. घाईत केलेला एक क्लिक मोठा आर्थिक फटका देऊ शकतो. थोडी सतर्कता मोठे नुकसान टाळू शकते.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget