UPI Pin Safety Tips : कोरोना महामारीनंतर ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड (Online Payment) खूप वाढला आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. ऑनलाइन पेमेंट करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, युपीआय पिन (UPI PIN). या एका पिनमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 


ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसं राहायचं? याबद्दल बँका लोकांना सतत माहिती देत ​​असतात. अलिकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना UPI पिनच्या योग्य वापराविषयी सांगितलं आहे. ऑनलाइन पेमेंट करताना लोकांना फक्त UPI पिन टाकावा लागेल, असं एसबीआयनं म्हटलं आहे. तसेच, बँकेनं काही टिप्स उघड केल्या आहेत. ज्याचा वापर ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. 



UPI म्हणजे काय? 


UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी एकाच मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे दोन बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरण सुलभ करते. या फीचरच्या मदतीनं तुमचा स्मार्टफोन व्हर्च्युअल डेबिट कार्ड म्हणून वापरता येईल. तुम्ही UPI च्या मदतीने पैसे मिळवू आणि पाठवू शकता. पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल. 


UPI पिनद्वारे फसवणूक टाळण्यासाठी टिप्स


UPI फसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत :


1. UPI पिन फक्त पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे, पैसे मिळवण्यासाठी नाही
2. पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी मोबाइल नंबर, नाव आणि UPI आयडी वेरिफाय करा
3. तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका
4. निधी हस्तांतरणासाठी स्कॅनर वापरून पाहा
5. कोणत्याही उपायासाठी अधिकृत वेबसाइटचाच वापर करा
6. कोणत्याही पेमेंट किंवा तांत्रिक समस्यांसाठी, अॅपच्या मदत विभागाचा वापर करा किंवा बँकेच्या तक्रार पोर्टलला भेट द्या


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha