Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles निर्मितीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिकीकरणासाठी सरकारने लिथियम, तांबे आणि कोबाल्टवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं देशात लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीला आणखी चालना मिळणार. यामुळं देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे. 


हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी किती बजेट?


लिथियम आयर्न बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम आणि कोबाल्ट हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. या घटकांवरील कस्टम ड्युटी कमी केल्याने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचा वेग वाढणार आहे. या अर्थसंकल्पात 2024-25 मध्ये, देशातील इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या वाहनांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी, वाहन उद्योगासाठी आणलेल्या एकूण बजेटपैकी जवळपास निम्मी रक्कम या वाहनांसाठी ठेवण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी FY24 मध्ये FAME II परिव्यय दुप्पट करून 5,172 कोटी रुपये केला होता. FAME योजना पहिल्यांदा 2015 मध्ये लागू करण्यात आली होती. या योजनेमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. ही वाढ विशेषतः इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये दिसून आली आहे.


इलेक्ट्रिक कारची किंमत जास्त का?


इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी कमी केली तर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला, विशेषत: दुचाकी श्रेणीमध्ये मोठी चालना मिळेल. इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीची किंमत EV निर्मात्यांसाठी एक आव्हान आहे, कारण नियमित वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत हा फरक आहे.


काय स्वस्त काय महाग होणार?


काय स्वत होणार?


सोनं, चांदी स्वस्त होणार
सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी स्वस्त 
इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
सोलार सेट स्वस्त होणार
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
विजेची तार


काय महाग होणार?


प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार
प्लास्टीक उत्पादने महाग होणार
सिगारेट
विमान प्रवास
पीव्हीसी फ्लेक्स शीट
मोठ्या छत्र्या


लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.


महत्वाच्या बातम्या:


Union Budget 2024-25: मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI