Turmeric Price : सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना (Turmeric Price) सुगीचे दिवस आले आहेत. कारण हळदीच्या दरात (Turmeric Price) चांगलीच वाढ होताना दिसत आहे. याचा मोठा फायदा हळद उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. सध्या कर्नाटक (Karnataka) राज्यात हळदीला विक्रमी दर मिळत आहे. कर्नाटकमध्ये प्रतिक्विंटल कांद्याला 20 हजार रुपयाहून अधिकचा दर मिळत आहे. तब्बल 13 वर्षानंतर हळदीच्या दरात ही विक्रमी वाढ झालीय. 


कर्नाटक जिल्ह्यातील चामराजनगर बाजारपेठेत हळदीला 20000 रुपयांचा दर मिळाला आहे.  यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. दुष्काळ आणि दरात झालेली घसरण याचा मोठा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. सध्या बाजारात हळदीची कमी प्रमाणात आवक सुरु आहे. त्यामुळं दरात तेजी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरात वाढ झाल्यामुळं सध्या ज्या शेतकऱ्यांनाकडे हळद आहे, त्यांना फायदा होतोय. 


चामराजनगर जिल्ह्यात  7207 हेक्टरवर हळदीची लागवड


मिळालेल्या माहितीनुसार चामराजनगरमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलीय. चामराजनगर जिल्ह्यात  7207 हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आलीय. दुष्काळी स्थितीमुळं यावर्षी कमी प्रमाणात हळदीची लागवड झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या ठिकाणच्या हळदीला 16000 ते 20000 रुपयांचा दर मिळत आहे. 


तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात हळदीची मोठी बाजारपेठ 


दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातही हळदीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी हळदीला प्रतिक्विंटल 21000 रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. इरोड हे दक्षिण भारतातील प्रमुख हळद केंद्र आहे. याठिकाणी हळदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानं शेतकरी आनंदात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून इरोडमध्ये हळदीच्या दरात 6000 ते 7000 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  ही वाढ विक्रमी समजली जातेय.


महत्वाच्या बातम्या:


हळदीला दराची 'झळाळी', शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिक्विंटलला मिळतोय 'एवढा' दर